कोरोनामूळे पती गमावलेल्या विधवांना निराधार योजनेचा आधार

 

पाचोरा, प्रतिनिधी । कोरोनामुळे पती गमावलेल्या विधवांना संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी पाचोऱ्याच्या तहसीलदारांनी घेतलेल्या पुढाकाराचे  सर्वत्र कौतुक होत आहे

 

कोरोनाने सहा महिन्यांत कुटुंब प्रमुखाचे निधन झाल्याने पत्नी, मुले, वृद्ध आई – वडील यांना दिलासा मिळावा या  हेतूने पाचोरा येथील तहसिलदार कैलास चावडे यांनी गरजू विधवा महिलांची यादी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. समाधान वाघ यांचे कडून प्राप्त करून घेत तालुक्यातील अशा व्यक्तींच्या घरी जाऊन त्यांची आर्थिक परिस्थिती समजून घेतली  तालुक्यातील सहा विधवा महिलांना संजय गांधी निराधार योजनेत समावेश करुन बुधवारी स्वत: त्यांचे घरी जाऊन योजना मंजूर झाल्याचे पत्र दिल्याने महिलांकडून तहसिलदार कैलास चावडे, संजय गांधी निराधार योजनेचे नायब तहसिलदार भागवत पाटील, अव्वल कारकून भाऊसाहेब नेटके,  सीमा पाटील व श्री जडे यांचे आभार मानले आहेत. तहसिलदारांच्या या प्रयत्नाचे   तालुकाभरातून कौतुक होत आहे

पाचोरा तालुक्यातील बांबरुड (राणीचे) येथील संभाजी बोरसे, प्रताप काळे, सुभाष काळे, सारोळा खुर्द येथील नरेंद्र अहिरे, पाचोरा येथे संतोष मोरे, खेडगाव (नंदिचे) येथील गौतम बाविस्कर या़चे कोरोना व्हायरस मुळे दोन महिन्यांपूर्वी निधन झाले होते, तहशिलदार कैलास चावडे यांनी व त्यांचे संजय गांधी योजनेतील सहकाऱ्यांनी मयताचे घरी जावून प्रत्यक्ष घरची आर्थिक परिस्थिती जाणून घेतल्यानंतर उत्पनाच्या दाखल्या पासून ते योजनेस लागणाऱ्या सर्व कागदपत्रांची पुर्तता करून घेत सहा प्रकरणास शासनाच्या नियमांचे अधिन राहून  मंजूर करून त्यांचे निवासस्थानी जाऊन त्यांना लाभ  मंजूर झाल्याचे पत्र दिले आहे,

 

गेल्या वर्षी नाशिक विभागाचे आयुक्त राधाकृष्ण गमे पाटील यांनी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांसाठी “उभारी” नावाची योजना आनून मयताचे वारसांना मुळ प्रवाहात आनण्याचे काम केले होते या योजनेत पाचोरा उपविभागाचे उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे पाटील, तहसिलदार कैलास चावडे, तात्काळीन तहसिलदार माधुरी आंधळे (भडगाव) यांनी नाशिक विभागात उत्कृष्ट कामगिरी केल्यांने विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे पाटील यांनी पाचोरा उपविभागाचे कौतुक केले होते. त्याच प्रमाणे यावर्षी तहशिलदार कैलास चावडे यांनी कोरोना व्हायरसमुळे निधन झालेल्या मयताच्या वारसांना संजय गांधी निराधार योजनेचा लाभ दिल्याने हा आदर्श जिल्ह्यातील अधिकाऱ्यांनी घेण्यासारखा आहे.

कोरोना व्हायरस काळात आरोग्य आणि पोलीस प्रशासनासोबत महसूल प्रशासन काम करत असताना आमच्या नजरेसमोर मृत्यू झाल्याचे व त्यांच्या कुटुंबावर ओढावलेली परिस्थिती आम्ही प्रत्यक्ष पाहिली आहे. गरीब कुटुंबांच्या वारसांना काही प्रमाणात दिलासा मिळावा या दृष्टिकोनातून आम्ही २५ मयतांचे घरी जाऊन सर्वेक्षण केले. मयताचे कुटुंब हे दुःखात असल्याने ते तहसील कार्यालयापर्यंत येऊ शकत नाही म्हणून आम्ही निकषात बसणाऱ्या सरला बोरसे, अरुण  काळे, ज्योती काळे, पंचशीला  अहिरे, शीतल  मोरे व संगीता  बाविस्कर या सहा महिलांना निराधार योजनेचा लाभ मिळवून दिला या महिलांच्या पाल्यांसाठी शहरातील सेवाभावी संस्था व दानशूर व्यक्तींकडून निधी जमा करून त्यांच्या शिक्षणासाठी व्यवस्था करणार असल्याची माहिती तहसीलदार कैलास चावडे यांनी दिली.

 

*माझे पती सुभाष काळे यांचे ५ एप्रिलला कोरोनामुळे निधन झाले. त्याचा धक्का माझ्या सासऱ्यांना सहन न झाल्याने अवघ्या ५ दिवसात त्यांचाही मृत्यू झाला. माझेवर दोन लहान मुले व वृद्ध सासूबाईंची पालन पोषणाची जबाबदारी येऊन ठेपल्याने सर्वांचा उदरनिर्वाह करणे कठीण झाले आहे. तहसीलदार कैलास चावडे यांनी मला संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळवून दिल्याने माझ्या कुटुंबाला दिलासा मिळणार असल्याचे लाभार्थी ज्योती काळे (रा. राणीचे बांबरुड ) यांनी सांगितले.

 

Protected Content