बोदवड-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । कोळी महासंघाची महत्वाची बैठक भुसावळ शहरातील विश्रामगृह येथे घेण्यात आली. ही बैठक रावेर लोकसभेचे जिल्हाध्यक्ष हरीलाल कोळी यांच्या नेतृत्वात ही बैठक घेण्यात आली. यावेळी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.
संघटना कशी मजबूत होईल यावर भर देण्यात आला. महासंघाचे अनेक पद खाली आहे ,ते कसे भरता येईल त्यावर सुद्धा चर्चा करण्यात आली. कर्मचारी महासंघाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष जितेंद्र सपकाळे यांनी अनेक महत्त्वाच्या विषयावर हात घालल्या, त्यावर चर्चा करण्यात आली. सर्व तालुकाध्यक्ष यांचे विचार सुद्धा ऐकण्यात आले. गाव तेथे महासंघाचे शाखा उभारण्यात भर देण्यात आला. लवकरच भुसावल शहरामध्ये कार्यालयाचे उद्घाटन होणार आहे. असे सांगण्यात आले.
याप्रसंगी जिल्हाध्यक्ष लालभाऊ कर्मचारी महासंघाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष जितेंद्र सपकाळे, महिला जिल्हाध्यक्षा हेमलता सोनवणे, भुसावळ शहराध्यक्ष भरत पाटील, महिला शहर अध्यक्ष कविता महाले, भुसावल तालुका उपाध्यक्ष महिला भारती कोळी, भुसावल तालुकाध्यक्ष भुसावल तालुकाध्यक्ष देविदास कोळी, भुसावल शहर उपाध्यक्ष धीरज कोळी, जामनेरचे अध्यक्ष संतोष कोळी, बोदवडचे तालूकाध्यक्ष सुरेश कोळी, विनायक कोळी, रावेर उपाध्यक्ष मोहन शंकपाळ, महेश सोनवणे, संदीप कोळी, किरण तायडे, अशोक कोळी, गोपाळ कोळी, नितीन सपकाळे, अंजाळे बाळू, नामदेव कोळी, तालुकाध्यक्ष बंडूभाऊ कोळी, डॉ. शोभा सोनवणे, रमेश सोनवणे, मुक्ताईनगर रावेर लोकसभेचे युवा जिल्हाध्यक्ष खेमचंद कोळी, कोळी महासंघाचे लोकनियुक्त सरपंच यांचा सुद्धा सत्कार करण्यात आला. सहदेव सपकाळे रावेर लोकसभा जिल्हा महासचिवपदी निवड करण्यात आली. आभार विनायक कोळी यांनी मानले.