बोदवड महाविद्यालयात सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन

bodavad

बोदवड प्रतिनिधी । येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात सांस्कृतिक विभागाच्या वतीने आज दि. 6 सप्टेंबर रोजी सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन प्रसिद्ध अल्बम फेम, गीतलेखक व गायक अण्णा सुरवाडे यांचे हस्ते करण्यात आले.

याबाबत अधिक माहिती अशी की, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य अरविंद चौधरी होते. तर व्यासपीठावर उपप्राचार्य डी.एस.पाटील, सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ.अनिल बारी, प्रा.अजय पाटील, प्रा.कांचन दमाडे, डॉ.वंदना बडगुजर हे उपस्थित होते. याप्रसंगी प्राचार्य चौधरी यांनी सुरवाडे यांच्या गायन क्षेत्रातील खडतर प्रवासाचा व त्याच्या महाविद्यालयातील कलागुणांचा परिचय विद्यार्थ्याना करून दिला. तसेच सुरवाडे यांच्या महाविद्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला. कार्यक्रमासाठी डॉ.अनिल बारी, प्रा.अजय पाटील, प्रा.कांचन दमाडे, डॉ.वंदना बडगुजर यांनी अथक परिश्रम घेतले. या कार्यक्रमाला विद्यार्थीनींनी उस्फूर्त प्रतिसाद दिला. विशेष म्हणजे ‘फुगे घ्या फुगे’ या गाण्यावर सुरवाडे यांच्यासह विद्यार्थ्यांनी धमाल केली.

Protected Content