कळपातून भरकटलेली निलगाय येवती गावात शिरली

4ebd197a 4f40 4539 b6f4 3490af6e7cdc

 

येवती  ता .बोदवड (वार्ताहर) तालुक्यातील येवती गावाला लागून असलेल्या जंगलातून आपल्या कळपातून भरकटलेली एक निलगाय गावात शिरल्यामुळे काही वेळ घबराहटीचे वातावरण पसरले होते. गावात शिरलेल्या नीलगायीने अनेक घरात घुसत मोठ्या प्रमाणात नुकसान केले होते.

 

येवती शिवारातील जंगलात आपल्या कळपापासून भरकटलेली एक निलगाय गावाच्या जवळ येताच तिच्यावर कुत्र्यांनी पाठलाग सुरु करत तिच्यावर हल्ला चढविला. त्यानंतर भेदरलेली थेट गावात पोहचली. बुधवारी रात्री पासून ही निलगाय गावातच असून या निलगायीने अनेकांच्या घरात प्रवेश करून घरांमधील साहित्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. त्यात रामशंकर कचरे यांच्या खळ्याच्या तार कंपाउंडचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. गावातील इतर लोकांचे देखील किरकोळ नुकसान झाले आहे. दरम्यान सकाळी निलगाय गावात शिरलेली असल्याचे निदर्शनात येताच विनोद शिंदे यांनी तात्काळ वनविभागाला कळविले. त्यानंतर वनरक्षक राजेश सोनवणे हे तातडी गावात पोहचले. त्यांनी निलगायीचे निरिक्षण करत कुत्र्यांनी अनेक ठीकाणी चावा घेतल्याने या निलगायीला उपचारार्थ बोदवड येथील पशुवैद्यकिय रूग्णालयात नेले. प्रथमोउपचार केल्यानंतर निलगायीला साळशींगीच्या जंगलात सोडण्यात येणार असल्याचे वनरक्षक राजेश सोनवणे यांनी सांगितले. दरम्यान यावेळी सरपंच संजय पाटील, विनोद शिंदे , ईश्वर वाघ ,पांडुरंग वाघ ,गयास खान , शामराव वाघ ,विनोद ठाकुर ( आबा ठाकुर  ) ,  सुधाकर माळी ,श्रीराम महाजन, रवी माळी, शिवाजी खांडवे , बाबुराव वाघ हे या वेळेस उपस्थित होते. दरम्यान येवती, रेवती व शेलवड या शेती शिवारास मोठ्या प्रमाणावर जंगल लागून असल्याने अनेक वन्यप्राणी या परिसरात नेहमीच दिसून येत असतात. तर या परिसरात पाण्याच्या शोधार्थ कळपाने निलगायी देखील कायम दिसून येतात. नीलगायी या परिसरातील शेतांमधील पिकांचे ही मोठ्या प्रमाणावर नुकसान करत असतात.

Protected Content