यावल शहरातून विवाहीत तरूण बेपत्ता

यावल – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । येथील परिसरात राहणारा एक विवाहीत तरुण हरवला असून त्याच्या पालकांनी खबर दिल्याने पोलीस ठाण्यात हरवल्याची नोंद करण्यात आली आहे.

या संदर्भात पोलीसानी दिलेल्या माहितीनुसार “यावल येथील कृष्णतारा नगर येथील चेतन राजेन्द्र घारू हा २४ वर्षीय विवाहीत तरूण हा आपल्या घरातून रविवार, दि. ५ जून रोजी रात्री साडेआठ वाजेपासून निघुन गेला. बराच वेळ झाल्यावरही तो घरी परत आला नाही. म्हणुन त्याच्या कुटुंबातील लोकांनी त्याचा शोध सर्वत्र घेण्याचा प्रयत्न केला. पण तो आढळून आला नाही.

त्यानंतर चेतन घारू यांची आई भारती राजेन्द्र घारू यांनी यावल पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार दिल्याने नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहे. आपला एकुलता एक विवाहीत मुलगा अशाप्रकारे हरवल्याने तिची आई भारती घारू यांनी चिंता व्यक्त केली.

Protected Content