मुंबई | हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते दिलीप कुमार यांचे निधन झाले असून हॉस्पीटलमध्ये उपचार सुरू असतांना त्यांनी शेवटचा श्वास घेतला.
मोहम्मद युसुफ खान यांचा जन्म पेशावर येथे ११ डिसेंबर १९२२ रोजी झाला होता. १९४४ साली ज्वारभाटा या चित्रपटाच्या माध्यमातून त्यांचा चित्रपटसृष्टीत प्रवेश झाला. यानंतर त्यांनी चित्रपटांचे एक युग गाजविले. यात अंदाज, आन, देवदास, मुगल-ए-आझम, गंगा-जमुना, राम और शाम, क्रांती, सौदागर आदी गाजलेल्या चित्रपटांचा समावेश आहे.
गेल्या काही दिवसांपासून दिलीपकुमार यांच्यावर उपचार सुरू होते. आज सकाळी साडेसातच्या सुमारास त्यांनी शेवटचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने एका युगाचा अंत झाल्याचे मानले जात होते.