रांची मैदानावर धोनीचा कसून सराव

Dhoni Net

रांची वृत्तसंस्था । भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी क्रिकेटपासून गेल्या दोन-तीन महिन्यांपासून लांब होता. अखेर धोनीने मैदानात पुनरागमन केले आहे. धोनीनं इंग्लंडमध्ये झालेल्या वर्ल्ड कपमध्ये न्यूझीलंड विरोधात अखेरचा सामना खेळला होता. धोनी वर्ल्ड कपनंतर निवृत्ती घेणार अशा चर्चांना उधाणं आले होते, मात्र रांची येथील मैदानावर धोनीने सराव केला. यासंदर्भातील व्हिडीओ देखील व्हायरल होत आहे.

महेंद्रसिंग धोनी वर्ल्ड कपनंतर निवृत्ती घेणार अशा चर्चा असताना, त्यानं विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर वेस्ट इंडिज, दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेश विरोधात त्यानं खेळण्याचा निर्णय घेतला नाही. दरम्यान धोनीनं पुन्हा एका क्रिकेट सरावाला सुरुवात केली आहे. झारखंड क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर धोनीनं सराव केला, त्यामुळं वेस्ट इंडिज विरोधात धोनी मैदानात उतरेल अशी अपेक्षा आहे. भारत-वेस्ट इंडिज यांच्यात 3 डिसेंबरपासून टी-20 मालिका होणार आहे. धोनीचा बॅटिंग करतानाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. क्रिकेटमधून विश्रांती घेतल्यानंतर धोनी स्नुकर आणि टेनिस खेळताना दिसला. आज क्रिकेटचा सराव करण्याआधी धोनीनं एक दिवस आधी लॉन टेनिस खेळण्याचा आनंद लुटला होता. धोनीच्या बॅटिंग प्रॅक्टिसचा व्हिडीओ त्याच्या चाहत्यांनी पोस्ट केला आहे. दरम्यान, धोनीला पुन्हा मैदानावर पाहणे ही चाहत्यांसाठी एक पर्वणी असणार आहे. टी-20 वर्ल्ड कप खेळण्यासाठी धोनी सज्ज असल्यामुळं त्याआधी तो मालिका खेळू शकतो.

Protected Content