क्रीडा साहित्य वाटप करून धीरज चौधरी यांचा वाढदिवस साजरा

0
15

भुसावळ प्रतिनिधी । येथील युवा नेते धीरज अनिल चौधरी यांच्या वाढदिवसानिमित्त संत गाडगेबाबा अनाथाश्रमात क्रीडा साहित्याचे वाटप करण्यात आले.

भुसावळचे माजी नगराध्यक्ष अनिल चौधरी यांचे चिरंजीव धीरज चौधरी यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. याचे औचित्य साधून सामाजिक कार्यकर्ते सारंगधर पाटील यांच्यातर्फे संत गाडगेबाबा अनाथाश्रमातील विद्यार्थ्यांना क्रीडा साहित्याचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी अनिल चौधरी, धीरज चौधरी, प्रकाश निकम, जयेंद्र लेकुरवाळे, वसतीगृहाचे व्यवस्थापक साळुंखे, गब्बर चावरिया, हर्षल सोनवणे, हेमंत बनवट, अमित कापसे, बिट्टू पवार, राजू पवार, मनोज बाबर, कासाबाई पवार, कमलाबाई जावरे, संजीवनी पवार, यशोदाबाई ठाकरे आदी मान्यवर उपस्थित होते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here