जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । गेल्या चार महिन्यांपासून अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे वेतन रखडले आहे. वेतन देण्यासह विविध मागण्यांसाठी जामनेर पंचायत समिती समोर धरणे आंदोलन करण्यात आले.
जामनेर तालुक्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचे गेल्या चार महिन्यापासून वेतन मिळाले नसून त्याच बरोबर इतर विविध मागण्यासाठी शुक्रवारी ३० जून रोजी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटना राज्य कार्याध्यक्ष रामकृष्ण पाटील यांच्या नेतृत्वात अंगणवाडी प्रकल्प एक व दोनच्या अंगणवाडी मदतनीस व सेविकांनी जामनेर पंचायत समिती समोर धरणे आंदोलन करण्यात आले. जर मागण्या पूर्ण झाल्या नाही तर काम बंद आंदोलन करू असा इशारा एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी एस. एस. सोनार यांना दिला आहे. मात्र अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या खात्यावर 26 जून रोजी दोघे महिन्याचे वेतन पडले असल्याची माहिती जामनेर एकात्मिक बाल प्रकल्प अधिकारी एस एस सोनार यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे