आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षा निमित्त कार्यक्रम

भडगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | भडगाव(प्रतिनिधी)-तालुक्यातील मौजे गिरड तालुका भडगाव येथे महाराष्ट्र शासन कृषी विभाग भडगाव यांचे वतीने आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ निमित्त शालेय विद्यार्थ्यांच्या प्रभात फेरी सह मिलेट ऑफ मंथ संकल्पनेवर बाजरी मिनीकिट वितरण, जनजागृती मोहीम तसेच रेशीम कौशल्य प्रशिक्षण कार्यशाळा व पौष्टीक तृणधान्ये प्रदर्शन भरविण्यात आलेले होते.

संयुक्त राष्ट्र संघाने २०२३ हे वर्ष आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून घोषित केलेले असून जागतिक स्तरावर आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून साजरे केले जात आहे या निमित्ताने देश पातळीपासून ते गाव पातळीपर्यंत सर्व स्तरांवर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे सदर कार्यक्रमांत कृषी महोत्सव, पौष्टिक तृणधान्य पोषण मूल्य विषयक कार्यशाळा, पौष्टिक तृणधान्य दालन, शेत तिथे पौष्टिक तृणधान्य मोहीम, पौष्टिक तृण धान्यांची बियाण्याचे मिनी किट वितरण, मिलेट ऑफ द मंथ संकल्पना, प्रभात फेरी, रोड शो , बाईक रॅली, मिलेट दौड, विविध विभागांचे समन्वयाने निबंध स्पर्धा, पाककला, रांगोळी स्पर्धा यांचे आयोजन करून अंगणवाडी सेविकांमार्फत पालकांमध्ये तृण धान्याची आरोग्य विषयक जागरूकता निर्माण करणे बाबत तसेच विविध भितीपत्रके, पोस्टर्स, आहार तज्ञांचे व्याख्याने इत्यादी कार्यक्रमांचे नियोजन संपूर्ण वर्षात विविध विभागांमार्फत करण्यात येणार आहे सदर कार्यक्रमाचाच एक भाग म्हणून कृषी विभागामार्फत मौजे गिरड तालुका भडगाव येथे प्रगतिशील शेतकरी पोपटराव पाटील यांचे शेतात पौष्टिक तृणधान्य वर्षानिमित्त शेतकरी प्रशिक्षण जनजागृती कार्यक्रम संपन्न झाला.

सदर कार्यक्रमात पौष्टिक तृणधान्याचे शेतकऱ्यांसाठी प्रदर्शन ठेवण्यात आलेले होते. सदर प्रदर्शनात ज्वारी,बाजरी ,राजगिरा,भगर व नाचणी या तृणधान्यांची माहितीसह स्टॉल ठेवण्यात आलेले होते तसेच विविध पौष्टिक तृणधान्यांचे आरोग्य विषयक माहितीचे फ्लेक्स बोर्ड चे प्रदर्शन ठेवण्यात आलेले होते.सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती वैशाली पाटील यांनी केले सदर कार्यक्रमात तालुका कृषी अधिकारी श्री भगवान गोर्डे यांनी प्रास्ताविक करताना पौष्टिक तृणधान्यांचे आहारातील महत्त्व विषद करताना मुख्य पौष्टिक तृणधान्य सह अन्य पौष्टिक तृणधान्यांची ओळख उपस्थित शेतकऱ्यांना करून दिली, त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय तृणधान्ये वर्षानिमित्त वर्षभरात मिलेट ऑफ द मंथ या संकल्पनेवर जानेवारी महिन्यात बाजरी , फेब्रुवारी महिन्यात ज्वारी , ऑगस्ट महिन्यात श्रावणाचा उपवास असल्याने राजगिरा , सप्टेंबर महिन्यात पितृपंधरवडा असल्याने राळ्याबाबत , ऑक्टोबर महिन्यात नवरात्र उत्सव असल्याने भगर बाबत व डिसेंबर महिन्यात नाचणी पिकाविषयी आरोग्य विषयक महत्त्वा बाबत जनजागृती मोहिमा कृषी विभागामार्फत राबविणार असले बाबत माहिती दिली त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष साजरे करताना पौष्टिक तृणधान्यांचे उत्पादन वाढविणे त्याचबरोबर पौष्टिक तृणधान्यांचे आरोग्य विषयक फायदे बाबत जनजागृती गाव पातळीपर्यंत करणे तसेच पौष्टीक तृणधान्यांचे लोकांच्या आहारातील प्रमाण वाढविणे या उद्देशाने विविध स्तरावर विविध कार्यक्रम घेणार असले बाबत माहिती दिली त्याच बरोबर कौशल्य प्रशिक्षणातून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी तुती लागवड करून रेशीम शेतीचा कृषी पूरक व्यवसाय सुरू करून स्वतःच रोजगार निर्मिती करणे बाबत उपस्थित शेतकऱ्यांना आवाहन केले तसेच सदर कृषी पूरक व्यवसाय हा हमीचा जोडधंदा असून हमी उत्पन्नाचे प्रति महिना संधी देणारा व्यवसाय असून शेतकऱ्यांनी उद्योजक म्हणून पाहणे बाबत उपस्थित शेतकऱ्यांना आवाहन केले
आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य निमित्त जिल्हा परिषद प्राथमिक कन्या शाळा, गिरड यांच्या मदतीने संपूर्ण गावात विद्यार्थ्यांमार्फत प्रभात फेरी काढण्यात आली सदर प्रभात फेरी दरम्यान विद्यार्थ्यांनी पौष्टिक तृणधान्यातील आहाराच्या महत्त्व विषयी घोषणा देऊन जनजागृती करण्याचा प्रयत्न केला त्याचबरोबर पौष्टिक तृणधान्याचे महत्त्व बालकांपासून पालकांपर्यंत पोहोचवणे व आहारातील समावेश वाढवणे या उद्देशाने विद्यार्थ्यांनी प्रबोधनात्मक पौष्टिक तृणधान्य विषद करणारे अनेक बोधवाक्य म्हणी व वाक्प्रचार यांचे प्रदर्शन प्रभातफेरी दरम्यान केले.
सदर प्रशिक्षण कार्यक्रमात मार्गदर्शनासाठी जिल्हास्तरावरून कृषी उपसंचालक अनिल जी भोकरे साहेब, उपविभागीय कृषी अधिकारी पाचोरा नंदकिशोर नायनवाड साहेब, जालना येथून तुती विषयक मार्गदर्शन करण्यासाठी विजय पाटील सर तसेच सुनसगाव, जामनेर येथून मधुकर पाटील यांनी उपस्थित राहून शेतकऱ्यांना बहुमोल मार्गदर्शन केले. गिरड चे सरपंच यांचेसह पंचायत समिती कृषी अधिकारी ईश्वर देशमुख साहेब हेही सदर कार्यक्रम प्रसंगी उपस्थित होते.

सदर कार्यक्रमात जालना येथील मार्गदर्शक विजय पाटील सर यांनी जालना जवळील कचरेवाडी या गावातील विविध शेतकऱ्यांचे यशस्वी तुती लागवडीचे उदाहरण देऊन वार्षिक ४ ते ५ लाख रुपये हमीचा किमान फायदा देणारा एकमेव कृषी पूरक जोडधंदा असून जास्तीत जास्त शेतकरी रेशीम शेती कडे वळणे बाबत मत व्यक्त केले, तसेच तुती लागवडीसाठी कमी खर्चात जास्त उत्पादनाची हमी असून अतिवृष्टी किंवा दुष्काळ परिस्थितीत किंवा नैसर्गिक आपत्तीने कोणत्याही प्रकारचे नुकसान न होता प्रति महिना हमीचे उत्पादन सदर व्यवसायामधून मिळण्याची शाश्वती असल्याने तसेच कर्नाटक येथील तुतीचे क्षेत्र २५ टक्के व चीनमधील तुतीचे क्षेत्र ५० टक्के कमी झाल्याने आपल्या शेतकऱ्यांना निश्चितच तुती लागवडीमध्ये भविष्य असले बाबत मत व्यक्त केले सदर कार्यक्रमात सुनसगाव येथील प्रगतिशील शेतकरी व ज्यांनी जळगाव जिल्ह्यात रेशीम शेतीची सुरुवात केली असे प्रगतिशील शेतकरी व मार्गदर्शक मधुकर पाटील यांनी तुती लागवडीतील आपले अनुभव कथन करून सर्व शेतीला पर्याय सर्व पिकांना पर्याय पीक व शेतीस हमीचा जोडधंदा म्हणून तुती लागवडीकडे शेतकऱ्यांनी पाहण्याचे व तुती लागवड करण्याचे आवाहन शेतकऱ्यांना केले.

प्रसंगी मधुकर पाटील यांच्या अनुभवातून अनेक शेतकऱ्यांना प्रेरणा मिळाली सदर प्रसंगी प्रत्यक्ष तुती लागवडीच्या शेतातही क्षेत्रीय पाहणी करून मार्गदर्शन करण्यात आले त्याचबरोबर जळगाव येथील कृषी उपसंचालक भोकरे साहेबांनी शेतकऱ्यांना आहारातील पौष्टिक तृणधान्याचा समावेश करताना वेगवेगळ्या महिन्यात वेगवेगळे तृणधान्य खाणे आरोग्यासाठी आवश्यक असून पौष्टिक तृणधान्याचे महत्त्व शेतकऱ्यांना पटवून दिले तसेच पौष्टिक तृणधान्यावर प्रक्रिया करण्यासाठी प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य उन्नयन योजनेअंतर्गत ३५ टक्के अनुदान असून जास्तीत जास्त १० लाखापर्यंत शेतकऱ्यांना अनुदान देय असून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी , महिला बचत गटांनी ,बेरोजगार युवकांनी ज्वारी ,बाजरी, राजगिरा ,भगर या पिकांवर प्रक्रिया करणारे उद्योग उभे करण्याचे प्रतिपादन केले तसेच आपल्या आहारात ज्वारी -बाजरीचा नियमित समावेश करून वजन कमी करणे, मधुमेह ,उच्च रक्तदाब या आजारांवर तसेच कुपोषण कमी करण्यासाठी, गर्भवती महिलांमध्ये ॲनिमियाचे प्रमाण कमी करण्यासाठी पौष्टिक तृणधान्यांचा आहारातील समावेश अत्यंत महत्त्वाचा असले बाबत प्रतिपादन करून आरोग्यविषयक महत्त्व शेतकऱ्यांना पटवून दिले.

कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते मिलेट ऑफ द मंथ संकल्पनेंतर्गत जानेवारी हा महिना बाजरी पिकासाठी समर्पित असल्याने बाजरी पिकाची मिनी किट शेतकऱ्यांना वितरित करण्यात आले तसेच सदर कार्यक्रमात पद्मालया फार्मर प्रोडूसर कंपनी शिवणी चे प्रमुख राहुल पाटील यांनी बाजरी या पिकांचे ग्राम बिजोत्पादन विषयी तसेच बाजरीच्या धनशक्ती या वाणातील लोह खनिज जस्त व आरोग्य विषय गुणधर्म विषयी माहिती दिली सदर वेळी बाजरी या पिकाच्या आरोग्यविषयक माहितीच्या लीफलेट चे विमोचन करण्यात येवून शेतकऱ्यांना वाटप करण्यात आले

सदर कार्यक्रमाचे शेवटी आभार प्रदर्शन पंचायत समिती कृषी अधिकारी ईश्वर देशमुख साहेब यांनी केले तसेच सदर कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन मंडळ कृषी अधिकारी उत्तम जाधव साहेब व कृषी सहाय्यक बनसोडे मॅडम यांनी केले त्याचबरोबर सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कृषी सहाय्यक सुखदेव गिरी, सचिन पाटील, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक अमोल पाटील, सुभाष राठोड, विनोद पाटील यांनी परिश्रम घेतले.

Protected Content