
धरणगाव (प्रतिनिधी) लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाच्या पोटनिवडणुकीसाठी शिवसेना-कॉंग्रेस आघाडीच्या प्रचाराचा शुभारंभ शनीवारी भव्य प्रचार रॅलीच्या निमित्ताने होणार आहे. दरम्यान, उमेदवार निलेश सुरेश चौधरी यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटनही उद्याच करण्यात येणार आहे.
उद्या सकाळी ८-३० वाजता बालाजी मंदिर पासून ते हेमगंगा कार्यालयपर्यंत प्रचार रॅली निघणार आहे. तर माजी मंत्री तथा आमदार गुलाबरावजी पाटील, काँग्रेस प्रदेश सचिव डी.जी.पाटील, शिवसेना जिल्हा प्रमुख गुलाबरावजी वाघ, प्रभारी नगराध्यक्षा अंजली भानुदास विसावे यांच्या शुभहस्ते नारळ वाढवून प्रचाराचा शुभारंभ केला जाणार आहे. तर शिवसेनेच्या वतीने कळविण्यात आले आहे की, धरणगाव शहरातील सर्व शिवसेना पदाधिकारी काँग्रेसचे पदाधिकारी, नगरसेवक व माजी नगरसेवक यांनी नगरपालिकेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष पदांचे अधिकृत उमेदवार निलेश सुरेश चौधरी यांच्या प्रचार नारळ फोडण्यासाठी व कार्यालय उदघाटन शुभारंभासाठी उपस्थिती द्यायची आहे. उपस्थितीचे आवाहन शिवसेना शहर प्रमुख राजेंद्र महाजन, युवा सेना शहर प्रमुख संतोष महाजन, काँग्रेस तालुका प्रमुख रतीलाल नाना चौधरी, काँग्रेस शहर प्रमुख राजेंद्र न्हायदे यांनी केले आहे. दरम्यान, यानिमित्ताने शिवसेना-कॉंग्रेस आघाडी शहरात आपले शक्ती प्रदर्शन करणार आहे.