अंजनविहिरे येथे सिमेंट बंधार्‍यांचे भूमिपुजन

धरणगाव (प्रतिनिधी) : पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या प्रयत्नांनी जलसंधारण महामंडळाच्या अंतर्गत तब्बल १३ कोटींच्या बंधार्‍यांना मान्यता मिळाली असून यात तालुक्यातील अंजनविहिरे येथे दोन सिमेंट बंधार्‍यांच्या कामांना ना. पाटील यांच्याहस्ते प्रारंभ करण्यात आला.

याबाबत वृत्त असे की, पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या प्रयत्नांनी जळगाव ग्रामीण मतदारसंघासाठी जलसंधारण महामंडळ, औरंगाबाद यांच्या अंतर्गत १३ कोटी रूपयांच्या बंधार्‍यांच्या कामांना मंजुरी मिळाली आहे. यातील विविध कामांना प्रारंभ करण्यात येत आहे. याच्याच अंतर्गत नुकतेच अंजनविहिरे येथील कामांचे भूमिपुजन ना. गुलाबराव पाटील यांच्याहस्ते करण्यात आले.

याप्रसंगी ना. गुलाबराव पाटील म्हणाले की, पाणी हे जीवन असून याचा संचय हा सर्वांसाठी अतिशय महत्वाचा असतो. या सिमेंट बंधार्‍यांच्या माध्यमातून सिंचनासाठी पाणी उपलब्ध होणार असून यामुळे परिसरातील भूमिगत जलपातळी उंचावण्यास देखील मदत होणार आहे.

या कार्यक्रमाला या प्रसंगी शिवसेना उपजिल्हा प्रमुख पी. एम. पाटील, जिल्हा परिषदेचे सदस्य गोपाल चौधरी, प्रभारी सभापती प्रेमराज पाटील, सभापती मुकुंद नन्नवरे, पंचायत समितीचे सदस्य प्रेमराज पाटील, दामू पाटील, संजय पाटील, उपसरपंच उमेश पाटील, रवींद्र चव्हाण, विलास चव्हाण, रोहिदास पाटील, नाना पाटील, रवींद्र पाटील, विठोबा पाटील, मुरलीधर पाटील, सुरेश पाटील, केशव पाटील, शिवाजी चव्हाण, किशोर पाटील, गणेश पाटील, महेश पाटील, अनिल पाटील, पंजाबराव पाटील, रामकृष्ण पाटील, धीरज पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. यांची उपस्थिती होती.

दरम्यान, जलसंधारण महामंडळाच्या अंतर्गत तब्बल १३ कोटींच्या बंधार्‍याच्या कामांमध्ये धरणगाव तालुक्यातील- बोरखेडा, अंजनविहिरे, सोनवद आणि हिंगोणा तर जळगाव तालुक्यातील- डोमगाव, बिलवाडी, म्हसावद, विटनेर, दापोरा, जवखेडा, जळगाव खुर्द आणि निमगाव येथील गावांमधील बंधार्‍यांचा समावेश आहे.

Protected Content