धरणगाव प्रतिनिधी । शनिवारी रात्री अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत एक जण ठार झाला असून दोन गंभीर जखमी झाले आहेत.
याबाबत वृत्त असे की, वेले ते मजरे-होळ दरम्यान अज्ञात चारचाकीने दिलेल्या जबर धडकेमुळे दुचाकीस्वार जागीच ठार झाला आहे. तर त्याची पत्नी व मुलगी हे दोन्ही गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. मध्य प्रदेशातील निरगुड्या येथील सुबण्या बारेला (वय ३२) हा त्यांची पत्नी निर्मला बारेला (वय २६) व मुलगी भारती बारेला(वय १३) यांच्यासह चोपडयाहून धरणगावकडे हिरोहोंडा पॅशन दुचाकी (एमपी – ६९०५)ने जात असताना वेले ते मजरे-होळ दरम्यान चोपड्याकडे जाणार्या एका अज्ञात चारचाकीने समोरुन दुचाकी जबर धडक दिली. यात दुचाकीस्वार सुबण्या बारेला हे जागीच ठार झाले. तर निर्मला बारेला व भारती बारेला यांना गंभीर दुखापत झाली आहे.