धरणगावात राष्ट्रवादीतर्फे केंद्र सरकारचा निषेध

धरणगाव प्रतिनिधी | येथे तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने केंद्र सरकारच्या सर्वसामान्यांच्या विरोधी धोरणाचा निषेध करण्यात आला.

धरणगाव तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला. याच्या अंतर्गत रास्ता रोको आंदोलन करुन तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. याप्रसंगी माजी मंत्री गुलाबराव देवकर व राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील यांनी केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांवर कडाडून टीका केली. या प्रसंगी राष्ट्रवादीचे युवक जिल्हाध्यक्ष रवींद्र नाना पाटील, माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन, जिल्हा उपाध्यक्ष वाल्मीक पाटील, तालुकाध्यक्ष धनराज माळी, युवक तालुकाध्यक्ष नाटेश्वर पवार, युवक शहराध्यक्ष संभाजी कंखरे, रवींद्र पाटील, जिल्हा उपाध्यक्ष दीपक वाघमारे, कल्पिता पाटील, अरविंद देवरे, निशांत शिसोदे, मोहन पाटील, नीलेश चौधरी, प्रकाश महाजन, अरविंद मानकरी, कल्पना अहिरे, शोभा पाटील, बाळू पाटील, लिलाधर पाटील, संजय पाटील, शालिक पाटील, शरद पाटील, मनोज पाटील, भूषण पाटील, ओंकार महाजन, सीताराम मराठे, सागर वाजपाई, अमोल हरपे, कांतीकुमार कोळी, शरद पाटील, किशोर निकम, किरण पाटील, जितू मराठे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!