धरणगाव, प्रतिनिधी | येथील नगराध्यक्ष पदासाठीच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसने शिवसेनेला म्हणजे महाविकास आघाडीच्या घटकाला पाठिंबा जाहीर केला आहे. आमदार गुलाबराव पाटील यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, प्रदेश सचिव डी.जी. पाटील, जिल्हाध्यक्ष संदीपभैय्या पाटील यांच्याशी चर्चा केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला.
त्यानुसार काँग्रेसचे अधिकृत उमेदवार दीपक जाधव यांनी वरिष्ठांनी आदेश दिल्यामुळे माघार घेतली असून ते व शहरातील काँग्रेसचे सगळे कार्यकर्ते हे शिवसेनेचे अधिकृत उमेदवार निलेश सुरेश चौधरी यांच्यासोबत एक दिलाने काम करणार आहेत. असे काँग्रेसतर्फे कळवण्यात आले आहे.