…पण संभाजीराजे खासदार व्हावेत, अशी काँग्रेसची मनापासून इच्छा – नाना पटोले

मुंबई, लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा |  संभाजीराजेंनी शिवसेनेचा पाठिंबा न मिळाल्याचा खेद व्यक्त करीत राज्यसभेच्या उमेद्वारीतून माघार घेतली. यावर इतर पक्षांचे माहीत नाही परंतु संभाजीराजे राज्यसभेत जावेत अशी काँग्रेसची मनापासून इच्छा असून त्यांना कॉंग्रेसचा कायमच पाठींबा आहे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ट्वीट द्वारे म्हटले आहे.

राज्यसभेसाठी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढविण्याचा निर्णय छत्रपतीं संभाजीराजेनी जाहीर केला होता. महाविकास आघाडीने पाठींबा द्यावा, यासाठी मुख्यमंत्र्यांची देखील भेट घेतली. मात्र, शिवसेनेच्या भूमिकेनंतर छत्रपतींनी ही निवडणूक लढवणार नसल्याचे जाहीर केल्यामुळे आता संभाजीराजे खासदार होणार नाहीत हे स्पष्ट झाले.

यावर संभाजीराजेंनी खासदार न होणं दुर्देवी असून शिवसेनेने त्यांना पाठींबा न देता प्रवेशाची अट घालून दुसरा उमेदवार दिला. छत्रपतींच्या नेतृत्वामुळे महाराष्ट्राच्या नेतृत्वाला एक वेगळेच स्थान मिळाले असते. पण राज्याचे ते दुर्दैव आहे. इतर पक्षांना त्यांच्याबद्दल काय वाटते, हे माहीत नाही. परंतु संभाजीराजे राज्यसभेत जावेत, अशी काँग्रेसची मनापासून इच्छा असून त्यांना कायम पाठींबा राहील असे पटोले यांनी म्हटले आहे.

छत्रपती संभाजीराजेंच्या माघारीच्या निर्णयामुळे राज्यात सत्तेत असणाऱ्या महाविकास आघाडीत मात्र वैचारिक मतभेद तीव्र असल्याचे चित्र, काँग्रेस महाराष्ट्र प्रदेशाध्य नाना पटोले यांच्या वक्तव्यावरुन दिसून येत आहेत.

Protected Content