भाजपला बाजार समितीत हव्यात सन्मानजनक जागा !

धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | आगामी कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या मेळाव्यात सन्मानजनक जागा मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

आगामी बाजार समितीच्या निवडणुकीच्या पार्श्‍वभूमिवर, तालुक्यातील साकरे येथे भारतीय जनता पक्षाचा मेळाव्या आयोजीत करण्यात आला. या प्रसंगी विविध स्थानिक संस्थेचा निवडणुका विषयी युती संदर्भात चर्चा करण्यात आली. यात सन्मानजनक जागा न मिळाल्यास स्वबळावर निवडणूक लढविण्याचा निर्णय घेण्यात आला.

या प्रसंगी मेळाव्यात जिल्हा उपाध्यक्ष पी.सी. पाटील,जेष्ठ नेते सुभाष अण्णा पाटील,चंद्रशेखर अत्तरदे, ओबीसी जिल्हाध्यक्ष संजय महाजन,शिरिष बयास,अँड. वसंतराव भोलाणे,तालुकाध्यक्ष जिजाबराव पाटील, एस. आर. पाटील ,एरंडोल चे माजी नगराध्यक्ष रवींद्र महाजन,शहराध्यक्ष दिलीप महाजन सह विविध मान्यवरांनी आपले विचार मांडुन सविस्तरपणे मार्गदर्शन केले.
प्रारंभी तालुका अध्यक्ष जिजाबराव पाटील यांनी कार्यक्रमाची रूपरेषा मांडली व आगामी काळातील निवडणुकीचा संदर्भात चर्चा करण्यात आली. मेळाव्यात एरंडोल व धरणगाव तालुक्यातील ग्रामपंचायत सदस्य,मार्केट कमिटीचे माजी सदस्य,वि.का.सोसायटी सदस्य,शेतकी संघ सदस्य, सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सरचिटणीस कन्हैया रायपुरकर यांनी केले तर आभार विशाल पाटील यांनी मानले कार्यक्रमासाठी नगरसेवक ललित येवले यांनी परिश्रम घेतले.

Protected Content