
मुंबई-वृत्तसेवा । जलसंपदा मंत्री ना. गिरीशभाऊ महाजन यांचे काल एका तरूणीसोबतचे फोटो व्हायरल झाल्यामुळे खळबळ उडाली असून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर आज ती तरूणी कोण आहे ? याबाबतची माहिती समोर आली आहे.

या संदर्भातील वृत्त असे की, परवा रात्री उशीरा ट्विटरवरून ना. गिरीशभाऊ महाजन यांचे एका तरूणीसोबतचे फोटो व्हायरल झाले. लागलीच शिवसेना-उबाठा नेत्या सुषमा अंधारे यांच्यासह अनेकांनी हे फोटो शेअर करत ना. महाजन यांच्यावर टिका केली. गिरीशभाऊ महाजन यांनी या संदर्भात बोलतांना संबंधीत छायाचित्रे ही मॉर्फ करून टाकण्यात आल्याचे स्पष्टीकरण दिले. त्यांनी या संदर्भात सायबर पोलीसात तक्रार देखील दिली. तर जळगाव येथे त्यांचे समर्थक नगरसेवक अरविंद देशमुख यांनी फेसबुकवरून सदर फोटो शेअर करणाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
दरम्यान, आज ना. गिरीशभाऊ महाजन यांच्या सोबतच्या तरूणीची माहिती देखील आज समोर आली आहे. गिरीश महाजन यांचे विशेष कार्यकारी अधिकारी अमोल पाटील यांनी तक्रार दाखल केली आहे. यात त्यांनी मंत्री महाजन यांचे त्यांच्या मित्राच्या मुलीसोबतचे फोटो फोटोशॉपच्या मदतीने मॉर्फ करून ते चुकीच्या पद्धतीने व्हायरल करण्यात आले आहेत. सोशल मीडियावरील फेसबूक, इन्स्टाग्राम आणि एक्सवरून हे फोटो तातडीने काढून टाकण्यात यावेत. तसेच हे फोटो शेअर करून व्हायरल करणाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करण्यात यावी, अशी मागणीही या तक्रारीच्या माध्यमातून करण्यात आली आहे.



