महाराष्ट्र राज्य वैद्यकीय प्रतिनिधी संघटनेचे विविध मागण्यांसाठी निदर्शने !

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । महाराष्ट्र राज्य वैद्यकीय प्रतिनिधी संघटनेच्या वतीने विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवारी २६ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आले.

 

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सध्या नागपूर हिवाळी अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात विधेयक क्रमांक ३३ चा प्रस्ताव मांडण्यात येणार आहे. यात महाराष्ट्र औद्योगिक संबंध अधिनियम, महाराष्ट्र कामगार कल्याण निधी अधिनियम, महाराष्ट्र माथाडी हमाल व इतर श्रमजीवी कामगार अधिनियम, खासगी सुरक्षा रक्षक अधिनियम व कामगारांच्या किमान घर भाडे भत्ता अधिनियम या पाच कायद्यातीन प्रस्तावित बदल हे मंजूरीसाठी ठेवण्यात येणार आहे. याच्या विरोधात महाराष्ट्र राज्य वैद्यकीय प्रतिनिधी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवेदन देण्यात आले आहे. हे विधेयक मागे घ्यावे व कामगारांचे हित जोपासावे अशी मागणी केली आहे. याप्रसंगी संघटनेचे अध्यक्ष नरेंद्रसिंह, रितेश शहा, सचिव संदीप पाटील, अमोल कुळकर्णी, चंपालाल पाटील, चेतन पाटील, अजहर शेख, विशाल चौधरी, महेश चौधरी, दिनेश शिंपी, मनीष चौधरी, राजेश पोद्दार यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Protected Content