रावेर येथे क्रुझर धडकेत वृध्द जागीच ठार

रावेर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । क्रुझर गाडीने धडक मारल्याने ‘नवी निंबोल’ येथील ६० वर्षीय इसमाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना रावेर तालुक्यात घडली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

राजराम धनु धनगर (वय ६० वर्ष) हे पातोंडीमार्गे रावेरकडे येत असतांना क्रुझर गाडीने जोरदार धडक मारली या धडकेत राजाराम धनगर जागीच ठार झाल्याची घटना आज दुपारी घडली आहे. या प्रकरणी क्रुझर गाडी चालका विरोधात रावेर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Protected Content