बँकेकडे तारण ठेवलेली जागा परस्पर विक्री; जिल्हापेठ पोलीसात दोन जणांवर गुन्हा दाखल

जळगाव प्रतिनिधी । बँकेकडे १२ लाखात गहाण ठेवलेली जागा परस्पर विक्री करून फसवणूक केल्याचा प्रकार उघकीला आला आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जिल्हापेठ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विठ्ठल काशिनाथ बावस्कर आणि त्यांची पत्नी सरला विठ्ठल बावस्कर दोन्ही रा. जामनेर जि.जळगाव यांची जळगाव शहरातील गट नंबर ४८७ असलेली २२५ चौरस मीटर ही जागा ही २०१६ मध्ये १२ लाखासाठी इक्विटस फायनान्स बँकेत तारण ठेवले होते. त्यानंतर विठ्ठल बावस्कर व त्यांची पत्नी यांनी २०१९ ते २०२० दरम्यान गहाण ठेवलेली जागा ही परस्पर विकून टाकली. हा प्रकार इक्विटस फायनान्स बँकेच्या अधिकाऱ्यांना समजले असता त्यांनी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात धाव घेऊन फसवणुकीची तक्रार दिली आहे. बँक व्यवस्थापक गणेश भालचंद्र शेडूते यांच्या फिर्यादीवरून विठ्ठल काशिनाथ बावस्कर आणि त्यांची पत्नी सरला विठ्ठल बावस्कर यांच्या विरोधात जिल्हापेठ पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक किशोर पवार करीत आहे.

Protected Content