जळगाव -लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी।अखिल भारतीय संघटनेच्या हाकेनुसार पुकारलेल्या संपात महाराष्ट्र राज्य विक्री व वैद्यकीय प्रतिनिधी संघटनेने संपात सहभाग नोंदवला असून विविध प्रलंबित मागण्या मान्य कराव्या या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बुधवार 20 डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजता निदर्शने करण्यात आले.
महाराष्ट्र राज्य विक्री व वैद्यकीय प्रतिनिधी संघटना जळगाव शाखेतर्फे बुधवार २० डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजता अखिल भारतीय संघटनेच्या हाकेनुसार देशव्यापी संपामध्ये सहभागी झाल्याचे पाहायला मिळाले.
यात विविध मागण्या करण्यात आल्या. यात नवीन श्रम संहिता रद्द करण्यात याव्यात .विक्री संवर्धन कर्मचारी कायदयाचे पुनर्जीवन करण्यात यावे. वैद्यकीय प्रतिनिधींचे कामाचे स्वरूप निश्चित करण्यात यावे. औषध व औषध उपकरणांवरील जीएसटी रद्द करून त्यांच्या किमती कमी करण्यात यावा. वैद्यकीय प्रतिनिधींच्या सरकारी रुग्णालयात तसेच इतर प्रायव्हेट रुग्णालयातील प्रवेशासंबंधीतील निर्बंध हटविण्यात यावे. यासह इतर विविध मागण्यांचे निवेदन जिल्हा प्रशासनाला देण्यात आले.
याप्रसंगी संघटनेचे अध्यक्ष नरेंद्र सिंग, रितेश शहा शाखा सचिव संदीप पाटील, चेतन पाटील चंपालाल पाटील, अझहर शेख, सागर घटक, अमोल कुलकर्णी, राजेश पोद्दार, गिरीश नारखेडे, महेश चौधरी, विशाल चौधरी, विजय चौधरी, मनीष चौधरी, विलास राजहंस, नितीन पाटील, यांच्यासह जिल्ह्यातील वैद्यकीय प्रतिनिधींची उपस्थिती होती