दुध व्यावसायिकांच्या घरी सव्वा ४ लाखांची चोरी

चाळीसगाव- लाईव्ह ट्रेन्ड्स न्यूज प्रतिनिधी | शहरातील एका दूध व्यावसायिकांच्या राहत्या घरातील मागील बेडरूममधील पत्री कपाटाच्या तिजोरीत ठेवलेले ४ लाख रुपये रोकडसह सोन्याचे दागिने असे एकूण सव्वा ४ लाखांचा ऐवज अज्ञाताने लंपास केल्याची धक्कादायक घटना आज उघडकीला आली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, शहरातील विजय प्रल्हाद स्वार (वय-४८) हनुमान मंदिर, हिरापूर रोड चाळीसगाव हे वरील ठिकाणी परिवारासह वास्तव्याला असून दूधाचा व्यवसाय करून ते कुटुंबांची उपजिवीका भागवीत असतात. दरम्यान काल रात्री १० ते आज रोजी सकाळी पहाटे ५ वाजताच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी घराचा कुलूप तोडून घरातील मागील बेडरूममध्ये पत्री कपाटाच्या तिजोरीत ठेवलेले ४ लाख रुपये रोकड, ५ ग्रॅम सोने (२००२ मधील) व १५ हजार रुपये किंमतीचे मोबाईल असे एकूण ४ लाख २० हजार रुपये ऐवज चोरून नेल्याचा उघडकीला आले. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस स्थानकात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आले असून पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या निर्देशानुसार पुढील तपास सुरू आहे.

Protected Content