घरकुल मंजूरीसाठी अधिकाऱ्यांकडून पैशांची मागणी; शिवसेना आक्रमक !

बोदवड-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । बोदवड तालुक्यातील ग्रामीण भागात घरकुल मंजूर करण्यासाठी २ ते १० हजाराची मागणी अधिकाऱ्यांकडून मागणी केले जात असल्याची माहिती समोर येत आहे. या संदर्भाता शिवसेनेचे पदाधिकारी यांनी पंचायत समिती कार्यालयात जावून जाब विचारला. त्यावेळी गटविकास अधिकारी सपकाळे यांनी संबंधित विभागाची चौकशी केली जाईल असे आश्वासन देण्यात आले. कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा शिवसेनेच्या वतीने देण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की, बोदवड तालुक्यात एकुण ५२ गावे आहेत. दरम्यान ग्रामीण भागात घरकुल मंजूर करण्यासाठी अधिकारी हे पैशांची मागणी करत आहे. या अनुषंगाने बोदवड तालुक्यातील निमखेड या गावी संतोष पाटील हिरामण पाटील यांचे पैसे दिल्याशिवाय घरकुलाचे काम होणार नाही, असे संबंधित अधिकाऱ्यांकडून मागणी केली जात आहे. याबाबत अनेक तक्रारी डॉ. उद्धव पाटील व प्रमोद धामोळे यांच्याकडे आल्यामुळे त्यांनी सरळ पंचायत समिती गाठली व गट विकास अधिकारी सपकाळे यांना याचा जाब विचारला. त्यावर सपकाळे यांनी सांगितले की, आम्ही सर्व अधिकाऱ्यांची बैठक ९ डिसेंबर रोजी बोलावण्यात आली आहे. या बैठकीत सर्व ग्रामसेवक अधिकाऱ्यांना हा जाब विचारला जाईल व कारवाई करण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले.

बोदवड तालुक्यामध्ये बरेच ठिकाणी घरकुल बांधकाम न करता चेक काडण्यासाठी जनतेला पैशांची मागणी करणे व बांधकाम न करता बरेच घरकुलाचे चेक काढले गेले असुन ही लाजिरवाणी बाब आहे. शिरसाळा येथे घरकुल न बांधता चेक काढले कसे ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्यामुळे ही पद्धत थांबवल्या गेली पाहिजे अशी प्रतिक्रीया डॉ. उद्धव पाटील यांनी बोलताना व्यक्त केले. अधिकाऱ्यांनी पैसे खाणे थांबवले नाही तर आम्ही शिवसेना स्टाईलने उत्तर देऊ असा इशारा शिवसेनेचे प्रमोद धामोळे यांनी दिला आहे.

Protected Content