संत गाडगेबाबा जयंतीला शासकीय सुटी घोषीत करण्याची मागणी

भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | संत गाडेगेबाबा यांच्या जयंतीला शासकीय सुटी जाहीर करावी या मागणीसाठी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना परीट धोबी समाज बांधवांतर्फे निवेदन देण्यात आले.

या संदर्भात काल भुसावळ येथे निवेदन देण्यात आले. यात म्हटले आहे की, अमरावती जिल्हा ही संत गाडगेबाबा यांची कर्मभुमी, जन्मभुमी असुन श्री. संत गाडगे बाबा यांनी त्यांचे जिवनात खुप महान कार्य केले आहे. त्यांचे विचार जिवंत रहावे व लोकाभीमुख राहुन त्यांच्या विचाराची प्रेरणा मिळावी या करीता संत गाडगेबाबा जयंती दि. २३ फेब्रुवारी हा दिवस ’शासकीय सुट्टी दिन’ म्हणुन घोषीत करण्यात यावा अशी तीस लाख धोबी समाजाच्या वतीने राज्य शासनाकडे मागणी करण्यात येत आहे.

या निवेदनात पुढे म्हटले आहे की, संत गाडगेबाबांनी महाराष्ट्रात स्वच्छता व व्यसनमुक्ती करिता आपले सर्व जीवन खर्ची घातले. समाजातील व्यसनाधिनता दुर होवून समाज सुशिक्षित व सुसंस्कृत व्हावा यासाठी आयुष्यभर किर्तनामधुन उपदेश करित राहिले. संत गाडगेबाबांनी जनतेला स्वच्छता व व्यसनमुक्तींचा संदेश दिला. अशा संत गाडगेबाबांच्या विचारावर चालणार्‍या महाराष्ट्र सरकारने संत गाडगेबाबांच्या जयंती निमित्ताने राज्यात जयंती दिनी संत गाडगेबाबा जयंती हा दिवस ’शासकीय सुट्टी दिन’ म्हणुन घोषीत करावा असे यात नमूद केले आहे.

सदर निवेदन देतांना जिल्हा अध्यक्ष कैलास शेलोडे, संस्था अध्यक्ष रमेश ठाकरे,पंचायत समिती सदस्य संतोष निसळकरष जिल्हा सचिव गोपाळ बाविस्कर, जिल्हा संघटक लक्ष्मण शेलोडे, भुसावळ तालुका प्रमुख नरेंद्र वाघ, भुसावळ शहर अध्यक्ष आनंदा सुरडकर, भुसावळ संस्था कार्याध्यक्ष बिसन बाविस्कर, जिल्हा उपाध्यक्ष श्री रवींद्र वागळे, सुधाकर सपकाळे आदींची उपस्थिती होती.

Protected Content