किनगाव बु ॥ येथील भुयारी गटारी बांधकामातील भ्रष्टाचाराच्या चौकशीची मागणी

यावल प्रतिनिधी । तालुक्यातीत किनगाव बु॥ ग्रामपंचायत अंतर्गत दलित वस्ती सुधार योजनेसंदर्भात भुयारी गटारी बांधताना झालेल्या कथित भ्रष्टाचाराची त्वरित चौकशी करावी, अशी मागणी सामाजीक कार्यकर्ते युवराज सोनवणे यांच्यातर्फे यावल पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना करण्यात आली आहे.

या संदर्भात दिनांक २५ / ८ / २०२१ रोजी यावल पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डॉ . निलेश पाटील यांना दिलेल्या निवेदनात युवराज सोनवणे व रामचंद्र दाजीबा पाटील यांनी म्हटले आहे की , यावल तालुक्यातील किनगाव बु॥या ग्रामपंचायती करीता दिनांक २५ / ५ / २०२१ रोजी जा. क़. प.स. यावल / बांधकाम / आर आर / १o१ / २o२१या जावक क्रमांकान्वये संबंधीत अधिकारी व पदाधिकारी यांनी किनगाव बु॥ ग्रामपंचायतीला दलीत वस्ती सुधार योजने अंतर्गत मिळालेल्या अंडर ग्राउंड गटारी कांधकामासाठी ९ लाख९९ हजार७१९ म्हणजे सुमारे दहा लाख रुपयांचा निधी देण्यात आला असता किनगाव बु॥ ग्रामपंचायतच्या सरपंच सौ .  निर्मला संजय पाटील आणी ग्रामसेवक प्रदीप रतन धनगर यांनी ठेकेदाराशी संगनमत करून त्यांच्या नांवावर आलेल्या निधी काढुन घेत  गावात पुर्वीच्याच बांधलेल्या जुन्या गटारी या नव्याने बांधल्याचे दाखवुन शासनाकडुन मिळालेल्या दहा लाख रुपयांचा निधी हडप केला असुन , मोठया प्रमाणावर भ्रष्ठाचार केला असुन या सर्व आर्थिक गोंधळात रावेरचे जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे उपअभीयंता, यावल पंचायत समितीचे कनिष्ठ अभीयंता आर पी इंगळे , गटविकास अधिकारी डॉ. निलेश पाटील, सरपंच निर्मला पाटील, ग्रामसेवक पी आर धनगर व ठेकेदार संदीप पाटील हे माजी आमदार यांचा नातेवाईक असल्याने या सर्वांनी सत्तेचा दुरुपयोग करून लाखो रुपयांचा बांधकाम निधीत अपहार केला असुन, यात संबंधीत अधिकाऱ्यांनी देखील कर्तव्यात कसुर केला असुन या सर्व आर्थिक भ्रष्ठाचाराची वरिष्ठानी तात्काळ चौकशी करून कार्यवाही करावी अशी मागणी लिखित निवेदनाव्दारे युवराज सोनवणे व रामचंद्र पाटील यांनी केली आहे.

Protected Content