Home राजकीय मंत्री गिरीश महाजन यांच्या बदनामीप्रकरणी कारवाईची मागणी ; सावदा भाजपकडून पोलिसांना निवेदन

मंत्री गिरीश महाजन यांच्या बदनामीप्रकरणी कारवाईची मागणी ; सावदा भाजपकडून पोलिसांना निवेदन

0
58

सावदा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांच्याविरोधात सोशल मीडियावर मॉर्फ केलेले फोटो तसेच बदनामीकारक मजकूर प्रसारित करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी भारतीय जनता पार्टी रावेर (सावदा मंडळ) यांच्या वतीने सावदा पोलीस स्टेशनकडे करण्यात आली आहे. याबाबत भाजप पदाधिकाऱ्यांनी पोलिस प्रशासनाला निवेदन देऊन संबंधित सोशल मीडिया खात्यांची चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

भाजपा रावेर (सावदा मंडळ) तालुकाध्यक्ष दुर्गादास प्रभाकर पाटील यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक, सावदा पोलीस स्टेशन यांना हे निवेदन देण्यात आले. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, काही व्यक्तींनी जाणीवपूर्वक मंत्री गिरीशभाऊ महाजन यांची सामाजिक, राजकीय आणि सार्वजनिक प्रतिमा मलीन करण्याच्या उद्देशाने फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर (X) तसेच अन्य सोशल मीडिया माध्यमांवर मॉर्फ केलेले फोटो आणि खोटा व दिशाभूल करणारा मजकूर प्रसारित केला आहे.

सदर पोस्ट आणि फोटो हे केवळ राजकीय टीकेच्या स्वरूपातील नसून जाणीवपूर्वक बदनामी करण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे. अशा प्रकारच्या पोस्टमुळे समाजात गैरसमज निर्माण होत असून सार्वजनिक जीवनात कार्यरत असलेल्या व्यक्तीच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचत असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणात काही सोशल मीडिया अकाउंट्स आणि संबंधित व्यक्तींची नावे समोर आली असून, संबंधित पोस्ट, डिजिटल पुरावे, स्क्रीनशॉट तसेच सोशल मीडिया लिंक पोलिस प्रशासनाकडे सादर करण्यात आल्याचे भाजप पदाधिकाऱ्यांनी सांगितले. या सर्व बाबींची सखोल चौकशी करून दोषींविरोधात लागू कायद्यानुसार गुन्हे दाखल करावेत आणि कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.

सोशल मीडिया हे प्रभावी माध्यम असले तरी त्याचा गैरवापर करून कोणाचीही प्रतिमा मलिन करण्याचे प्रकार वाढत आहेत. अशा प्रवृत्तींना वेळीच आळा घालणे आवश्यक असून, भविष्यात अशा घटना रोखण्यासाठी कठोर पावले उचलण्याची गरज असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. या निवेदनावर दुर्गादास प्रभाकर पाटील, श्रीकांत महाजन, विनायक दुर्योधन कोळी, महेश प्रभाकर अकोले, संजय काशिनाथ महाजन, रेखाताई रोहीदास बोंडे, जितेंद्र सुरेश चौधरी, रंजना जितेंद्र भारंबे, सारिका चव्हाण, सारिका मटकरी, जितेंद्र किसन भारंबे, शुभम एकनाथ पाटील, सचिन बराटे यांच्यासह असंख्य भाजप कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.


Protected Content

Play sound