दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांचा विजय


दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी या कालकाजी विधानसभा मतदारसंघातून विजयी झाल्या आहेत. तर आतिशी यांनी भाजपचे रमेश विधुरी आणि काँग्रेसच्या अलका लांबा यांचा पराभव केला. दिल्लीच्या मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाच्या नेत्या आतिशी यांनी कालकाजी मतदारसंघातून निवडणूक जिंकली आहे.

दरम्यान, दिल्लीतील कालकाजी विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाशी झालेल्या चुरशीच्या लढतीत आम आदमी पक्षाने विजय मिळवला आहे. आप आणि भाजपमध्ये जोरदार लढत झाली, त्यानंतर मुख्यमंत्री आतिशी यांनी भाजपचे रमेश बिधुरी यांचा पराभव करून निवडणूक जिंकली. या जागेवर काँग्रेसने अलका लांबा यांना उमेदवारी दिली होती.

मतमोजणीदरम्यान अनेक फे-यांमध्ये आतिशी भाजपच्या रमेश बिधुरी यांच्या मागे होत्या. मात्र हळूहळू बिधुरी यांच्या मतांमधील अंतर कमी होत गेले आणि शेवटी विजयी झाल्या. कालकाजी मतदारसंघातून पुन्हा विजयी झालेल्या आम आदमी पक्षाच्या आतिशी यांनी चार महिन्यांपूर्वी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. यासह त्या दिल्लीच्या तिस-या महिला मुख्यमंत्री बनल्या.

दिल्ली विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू होताच. अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील आम आदमी पक्ष (आप) सलग तिस-यांदा विजयी होणार की भाजप राजधानीतील २७ वर्षांचा सत्तेचा दुष्काळ संपवणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.