दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | नव्या वर्षात दिल्लीत निवडणूक होते आहे. दिल्लीत देशाचं चित्र एकवटलेले पाहण्यास मिळते. प्रत्येक संस्कृतीचे दर्शन या ठिकाणी होतं. दिल्लीकर यावेळी उत्तम प्रकारे मतदान करतील अशी आशा आहे असं मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी म्हटले आहे.
दिल्लीमध्ये ७० विधानसभेच्या जागा आहेत. १.५ कोटी हून अधिक उमेदवार दिल्लीत आहेत. २.०८ लाख मतदार असे आहेत जे पहिल्यांदा मतदान करणार आहेत. एका टप्प्यात दिल्लीची निवडणूक होणार आहे. ५ फेब्रुवारीला दिल्ली विधानसभेसाठी मतदान होणार तर ८ फेब्रुवारीला निकाल लागणार आहे अशी घोषणा मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी केली.
निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद सुरु झाली आहे. या पत्रकार परिषदेत दिल्ली विधानसभा निवडणुकीची आणि निकालाची तारीख जाहीर केली जाईल. ७० सदस्यांच्या दिल्ली विधानसभेचा कार्यकाळ २३ फेब्रुवारीला संपतो आहे. २०२० मध्ये दिल्ली विधानसभा निवडणुकीची घोषणा ६ जानेवारीला झाली होती. आता आज निवडणूक आयोगाकडून निवडणुकीसाठी ५ फेब्रुवारी ही तारीख जाहीर केली आहे. तर ८ फेब्रुवारीला निकाल लागणार आहे.