रावेर प्रतिनिधी । येथील पंचायत समितीच्या गटविकास अधिकारीपदी आज सौ. दीपाली कोतवाल या रूजू झाल्या आहेत.
रावेर पंचायत समितीला आज गट विकास अधिकारी पदाची सूत्रे २००९ च्या एमपीएससी बॅचच्या सौ दिपाली कोतवाल यांनी स्विकारले आहे.
तत्कालिन गट विकास अधिकारी डॉ सानिया नाकाडे यांची येथून बदली झाल्या नंतर त्यांच्या रिक्त पदावर सौ दिपाली कोतवाल यांची नियुक्ती झाली आहे.
दीपाली कोतवाल या मूळच्या जळगाव येथील रहिवासी असून हिंगोली जिल्हातून त्या जिल्हातील भडगाव येथे गटविकास अधिकारी म्हणून काम करत होत्या आज त्यांनी रावेर गट विकास अधिकारी म्हणून पदभार स्विकारला आहे.तालुक्याला भ्रष्ट्राचारमुक्त काम करण्याचे तसेच पूर्ण पारदर्शकतेने गरीब जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सौ कोतवाल यांनी लाईव्ह ट्रेंड्स न्यूजला सांगितले.