शेंदुर्णीत पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांचे जंगी स्वागत

शेंदुर्णी प्रतिनिधी । राज्यांचे पर्यटन मंत्री व शिवसेनेचे युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी जगप्रसिद्ध अजिंठा लेणी पाहण्यासाठी आले असता त्यांनी आपल्या धावत्या दौऱ्यात आज रात्री ८.३० वाजता शेंदुर्णी येथे भेट दिली.

यावेळी त्यांचे शाल श्रीफळ देऊन स्वागत जिल्हा परिषद सदस्य प्रताप पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, उपजिल्हाप्रमुख मनोहर पाटील, युवासेना जिल्हा प्रमुख शिवराज पाटील, जळगाव महानगर प्रमुख शरद आबा तायडे,विधानसभा क्षेत्र प्रमुख नीलकंठ पाटील ,युवासेना जिल्हा उपप्रमुख विश्वजीत पाटील ,शिवसेना प्रवक्ता तथा पत्रकार गणेशराव पांढरे, जामनेर तालुका उपप्रमुख डॉ सुनील अग्रवाल, शेंदुर्णी शहर अध्यक्ष संजय सूर्यवंशी, ॲड भरत पवार युवासेना अधिकारी अजय भोई युवासेना शहर प्रमुख, तसेच शेंदूर्णी येथील जेष्ठ शिवसैनिक बारकू जाधव, विलास बारी, अशोक बारी,अरुण गवळी,सुभाष बारी,संतोष माळी, सुनील गुजर, राजू पाटील, संदीप काटोले, भावेश गुजर, सिदेश्वर पाटील, शुभम घोलप, अजय भोई, सुनील बारी, प्रवीण चौधरी, प्रतीक पाटील, गगन मराठे, सुलतान भाई अन्य शिवसैनिक यांनी शाल-श्रीफळ सह शेंदुर्णीग्राम दैवत त्रिविक्रम भगवान यांची प्रतिमा भेट देण्यात आली.

शेंदुर्णी नगरीला मंदिरा करिता साडेचार कोटीचा निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचे विशेष आभार श्री त्रिविक्रम मंदिरचे पुजारी भूषण भोपे, हभप जीभाऊ पाटील,युवराज बारी (जय हरी ) यांनी प्रकट केले शिवसेना जिल्हा प्रमुख विष्णू भंगाळे व जिल्हापरिषद सदस्य प्रताप पाटील युवासेना जिल्हा प्रमुख सह जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकारी शेंदूर्णीत आल्याचे अवचित साधून मान्यवरांच्या हस्ते रोहित दादा पवार युवामंचाचे उपजिल्हा प्रमुख रवींद्र गुजर व कार्यकर्त्यानी शिवसेनेत प्रवेश केला.

Protected Content