दहीवद आरोग्य केंद्रात वैद्यकीय साहित्य उपकरणाचे लोकार्पण

चाळीसगाव प्रतिनिधी । तालुक्यातील दहीवद प्राथमिक आरोग्य केंद्रात  “चला आपले आरोग्य केंद्र सक्षम करू’ उपक्रमांतर्गत वैद्यकीय साहित्य उपकरणाचे मान्यवरांच्याहस्ते लोकार्पण करण्यात आले. 

चाळीसगाव तालुक्यात सेवा सहयोग ग्रामोदय प्रकल्पाअंतर्गत व गुणवंत सोनवणे यांच्या संकल्पनेतून “चला आपले आरोग्य केंद्र सक्षम करू’ या उपक्रमाला सुरुवात करण्यात आली आहे. गरजवंताला माफक दरात उपचार घेता यावे म्हणून तालुक्यातील दहिवद येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात  वंडरलैंड इंडिया प्रायव्हेट लिमिटेड व सेवा सहयोग यांच्या संयुक्त विद्यमाने ऑक्सिजन बेडस, मल्टीपॅरामीटर, फ्लो मीटर, जंबो सिलेंडर आदी साहित्य देऊन लोकार्पण सोहळ्याचे उद्घाटन सरपंच सुरेखा भीमराव पवार व उपसरपंच भारती पंडीत मोरे यांच्या हस्ते करण्यात आले.

या केंद्रांतर्गत दहिवद, राजमाने, कळमडु, अभोणे, धामणगाव, कुंझर, खडकी सीम, शिदवाडी, वडगाव लांबे व दसेगाव या पंचक्रोशीतील दहा गावांतील रुग्णांना या साहित्यांचा उपयोग होणार आहे.   कोरोनाच्या काळात आरोग्य यंत्रणेवरील वाढता ताण व मणुष्य बळाचा तुटवडा लक्षात घेऊन हे कार्य सुरू असल्याचे गुणवंत सोनवणे यांनी यावेळी सांगितले. यावेळी मेडिकल ऑफिसर डॉ. योगेश पाटील, डॉ. संदीप निकम डॉ.सारंग पाटील, डॉ. निकिता दाडी, भिमराव पवार, भिमराव खलाणे, शरद रंगराव वाघ, गोरख पवार, हिम्मत निकम, शैलेंद्र निकम, पंजाबराव नाना, सरपंच पोहरे काकासाहेब, सर्व ग्रा. सदस्य,  कर्मचारी , नर्स, आशा स्वयंसेविका आदींसह दयाराम सोनवणे, शाम सोनवणे, सवीताताई राजपूत, तलाठी अनिल निकम, कृषी सहाय्यक तुफान खोत, भीमराव पंडित, पंडित सुपडू, शैलेंद्र निकम, योगेश सोनवणे, पिंटू सोनवणे, राहुल राठोड, पंकज राठोड आधी उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सुत्र संचालन तुषार पाटील यांनी केले.

Protected Content