दीपनगरात स्थानिकांना रोजगार उपलब्ध करा : खा. रक्षा खडसे

 

 

भुसावळ प्रतिनिधी | तालुक्यातील दीपनगर येथील औष्णीक विद्युत केंद्राच्या नवीन प्रकल्पात स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून द्यावा असे निर्देश आज खासदार रक्षाताई खडसे यांनी दिले.

दीपनगी येथील औष्णिक विद्युत केंद्र नवीन ६६० मेगा वॅट प्रकल्पातून स्थानिक कंत्राटी कर्मचार्‍यांना राजकीय दबावापोटी काहीही कारण न देता कमी करण्यात आले. यामुळे त्यांना पुन्हा कामावर घेऊन स्थानिक गरजूंना सदर प्रकल्पात रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी भारतीय जनता युवा मोर्चा वरणगांव यांच्या वतीने आंदोलन करण्यात आले.

या आंदोलना ठिकाणी खासदार रक्षाताई खडसे व आमदार संजय सावकारे यांनी भेट देऊन ६६० मेगा व्हॅट प्रकल्पाचे सी.जी.एम रोकडे व ५०० मेगा व्हॅटचे सी.जी.एम राठोड यांच्यासोबत चर्चा करून कामावरून कमी करण्यात आलेल्यांना २ दिवसाच्या आत कामावर घेण्यात यावे याबाबत सांगितले असता त्यांना कामावर घेण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले.

Protected Content