जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | पैसे गुंतवणूक करून अधिकचा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत शिरसोली येथील तरूणाची ५ लाख २० हजारांची ऑनलाईन फसवणूक केल्याची घटना बुधवारी २९ मे रोजी उघडकीला आले आहे. याप्रकरणी १ जून रोजी दुपारी २ वाजता जळगाव सायबर पोलीस ठाण्यात अज्ञात दोन टेलीग्राम धारकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक असे की, जळगाव तालुक्यातील शिरसोली गावात शुभम दिलील लांबोळे वय २७ हा तरूण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. २८ आणि २९ मे रोजी टेलीग्राम धारक असलेले प्रिया शर्मा आणि दिव्या बस्सी असे नाव सांगणाऱ्या दोन जणांनी शुभमशी संपर्क साधला. त्याला गुंतवणक करून अधिकचा पैसे मिळवून देण्याचे सांगून त्याचा विश्वास संपादन केला. त्यानंतर वेळावेळी शुभम करून ऑनलाईन पध्दतीने वेगवेगळ्या बँक खात्यात सुमारे ५ लाख २० हजारांची रक्कम ऑनलाईन पध्दतीने मागवून घेतले. त्यानंतर नफा व मुद्दलची रक्कम शुभमने मागितली. परंतू त्याला उडवाउडवीची उत्तरे दिली. दरम्यान, आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर शुभम लांबोळे याने सायबर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून शनिवारी १ जून रोजी दुपारी २ वाजता सायबर पोलीस ठाण्यात टेलीग्राम धारक असलेले प्रिया शर्मा आणि दिव्या बस्सी असे नाव सांगणाऱ्या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम हे करीत आहे.