जळगाव जिल्हा चर्मकार विकास संघ – विविध तालुका कार्यकारिणी नियुक्ती जाहीर

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | जळगाव जिल्हा चर्मकार विकास संघातर्फे आज रविवार दिनांक २१ ऑगस्ट २०२२ रोजी श्री.वानखेडे गुरुजी हौसिंग सोसायटी, नेरी नाक्याजवळील श्री.संत रविदास समाज मंदिर सभागृहात विविध तालुका कार्यकारिणी नियुक्ती व सन्मान सभा संपन्न झाली.

याप्रसंगी प्रमुख पाहुणे चर्मकार विकास संघाचे राज्य संघटक राजू गायकवाड, मराठवाडा विभागीय अध्यक्ष सुखदेव काटकर, राज्य कार्यकारिणी सदस्य विश्वनाथ सावकारे, संजय वानखेडे, जिल्हा अध्यक्ष ॲड.चेतन तायडे, जिल्हा सहसचिव तथा शिक्षण विस्तार अधिकारी विजय पवार, ज्येष्ठ सल्लागार. रतीराम सावकारे आदींच्या उपस्थितीत सभा उत्साहात संपन्न झाली.

या सभेच्या सुरुवातीस प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते जगतगुरु संत शिरोमणी रविदास महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन तथा माल्यार्पण करण्यात आले. संजय वानखेडे यांनी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष संजयजी खामकर यांना शुभेच्छा दिल्यात. प्रास्तविकात “चर्मकार विकास संघाचे धेय्य व उद्दिष्टे सांगून समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी संघटीत होण्याचे आवाहन केले.

या प्रसंगी विविध तालुका कार्यकारिणी पदाधिकारी व सदस्य यांना  मान्यवरांच्या हस्ते नियुक्तीपत्र व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.

तालुका कार्यकारिणी पुढीलप्रमाणे –

भुसावळ तालुका पदाधिकारी

अध्यक्ष : किशोर घुले,

सचिव – नरेश सावकारे,

उपाध्यक्ष – राहुल डोळे,

प्रसिध्दी प्रमुख – मनोज घुले

चाळीसगांव तालुका कार्यकारिणी

अध्यक्ष सागर अहिरे,

कार्याध्य्क्ष – गोपाल चव्हाण

उपाध्यक्ष – तुषार मोरे

सचिव – मयूर अहिरे,

जळगाव तालुका कार्यकारिणी

अध्यक्ष – प्रा.रवींद्र नेटके

कार्याध्यक्ष – श्री.संतोष सावकारे

सचिव – संदीप ठोसर

खजिनदार – कैलास शेकोकार

उपाध्यक्ष -.विजय घुले, सहसचिव – ज्ञानेश्वर शेकोकार

रावेर तालुका कार्यकारिणी

युवा संघटक – भूषण वानखेडे

जळगाव महानगर कार्यकारिणी

अध्यक्ष – ॲड. अर्जुन भारुळे

कार्याध्यक्ष – युवराज घोलाणे

सचिव – पुरुषोत्तम चिमणकर

सहसचिव – कमलाकर ठोसर

उपाध्यक्ष – प्रा.संदीप शेकोकार

उपाध्यक्ष – दीपक नेटके

उपाध्यक्ष – ॲड. मुकेश कुरील

युवा संघटक – दीपक कळसकर 

सदस्य – विशाल तायडे

या सर्व नवनियुक्त पदाधिकारी यांचे अभिनंदन करण्यात येऊन त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. या प्रसंगी प्रमुख अतिथी सुकदेव काटकर यांनी समाज संघटित करून समाजोपयोगी उपक्रम आयोजित करण्याचे आवाहन केले. अध्यक्षाच्या वतीने भाषणामध्ये जिल्हाध्यक्ष ॲड. चेतन तायडे यांनी “समाजाने स्वयंरोजगाराकडे तरुणांना संधी निर्माण करून द्याव्यात. तरुणांनी नोकर बनण्यापेक्षा मालक बना.” असे आवाहन केले.

या प्रसंगी ज्येष्ठ सल्लागार केशव ठोसरे, वसंतराव नेटके, प्रकाश बाविस्कर,प्रा.दिलीप तायडे, संतोष तायडे, एम.आय.सपकाळे, प्रसिध्दी प्रमुख महेश कळसकर, ॲड. अर्जुन भारुळे, आदी उपस्थित होते. या सभेचे सूत्रसंचालन प्रा.धनराज भारुडे यांनी तर आभारप्रदर्शन गजानन दांडगे यांनी केले.

Protected Content