Home क्राईम कर्जबाराला कंटाळून विषारी औषध घेतलेल्या शेतकऱ्याचा मृत्यू

कर्जबाराला कंटाळून विषारी औषध घेतलेल्या शेतकऱ्याचा मृत्यू

0
114


धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धरणगाव तालुक्यातील चमगा येथील ४५ वर्षीय व्यक्तीने शेतातील कर्जबाजारीला कंटाळून सोमवारी २७ जानेवारी रोजी दुपारी शेतात विषारी औषध घेतले होते. त्यांना जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल केले असता गुरुवारी ३० जानेवारी रोजी पहाटे ५ वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. यासंदर्भात धरणगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. राजेश्वर आनंदा सावंत वय-४५, रा.चमगाव ता. धरणगाव असे मयत झालेले शेतकऱ्याचे नाव आहे.

या संदर्भात मिळालेली माहिती अशी की, धरणगाव तालुक्यातील चमगाव येथे राजेश्वर सावंत हे आपल्या आई, पत्नी आणि दोन मुलांसह वास्तव्याला होते. शेती करून ते आपला उदरनिर्वाह करत होते. गेल्या काही वर्षापासून त्यांनी शेती करण्यासाठी कर्ज काढले होते. पण सततची नापिकी आणि कर्जबाजाराला कंटाळून त्यांनी सोमवारी २७ जानेवारी रोजी दुपारी २ वाजता शेतात असताना विषारी औषध घेतले. त्यांचे प्रकृती खालावल्याने त्यांना त्यांच्या नातेवाईकांनी तातडीने जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू असताना गुरुवारी ३० जानेवारी रोजी पहाटे ५ वाजता त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या संदर्भात धरणगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्यांच्या पश्चात आई, कमलाबाई पत्नी आशाबाई आणि सागर, विशाल ही दोन मुले असा परिवार आहे.


Protected Content

Play sound