पोस्टमास्तर जनरल औरंगाबादतर्फे डाक अदालतीचे आयोजन

जळगाव, प्रतिनिधी । औरंगाबाद क्षेत्र संबंधित टपाल सेवेविषयी किंवा कामकाजाबद्दल ज्या तक्रारींचे निवारण सहा आठवड्याच्या आत झालेले नसेल व समाधान कारक उत्तर मिळाले नसेल अशा तक्रारींची दखल 11 डिसेंबर, 2019 रोजी आयोजित केलेल्या डाक अदालतीत घेण्यात येणार आहे. विशेषत: टपाल वस्तु, मनीऑर्डर, बचत बँक खाते, प्रमाणपत्र अशा सेवेंबाबतच्या तक्रारींचा समावेश असेल.

देशातील पोस्टल सेवा ही सामाजिक व आर्थिक जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे. देशातील प्रत्येक नागरिकांच्या मनामध्ये अपरोक्षपणे डाकघराच्या सेवेने एक वेगळ्या प्रकारचे स्थान निर्माण करून प्रभावित केले आहे. पोस्ट खाते हे लोकांना चांगल्या प्रकारची सेवा देण्याचा व ग्राहकांचे जास्तीत जास्त समाधान करण्याचा प्रयत्न करते. ही सेवा देताना संभाषणामध्ये/पत्रव्यवहामध्ये किंवा सेवामधील काही त्रुटी राहतात. त्यामुळे पोस्टाच्या सेवेबद्दल तक्रार करण्याची वेळ येते. ह्या तक्रारींचा योग्य प्रकारे न्याय निवाडा करण्यासाठी पोस्ट खात्याने वेळोवेळी डाक अदालती घेण्याचे ठरविले आहे.

तरी संबंधितांनी डाक सेवेबाबतची आपली तक्रार सहाय्यक निदेशक डाकसेवा, पोस्टमास्तर जनरल, औरंगाबाद यांचेकडे 5 डिसेंबरपर्यंत अथवा तत्पुवी पोहचेल, अशा बेताने पाठवावी. असे आवाहन पोस्टमास्तर जनरल औरंगाबाद क्षेत्र, औरंगाबाद यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

Protected Content