गळफास घेऊन एकाची आत्महत्या

death penalty hanging

जळगाव प्रतिनिधी । शहरातील वाघ नगरजवळ असलेल्या कोल्हे हिल परिसरात राहत्या घरात 52 वर्षीय व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे आज पहाटे 5.30 वाजेच्या सुमारास उघडकीस आले. याबाबत रामानंदनगर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, वसंत सुकलाल माळी (वय-52) रा. शिवबा नगर, कोल्हे हिल्स परिसर, सावखेडा शिवार यांनी 3 जुलै रोजीच्या पहाटे 5.30 वाजेच्यापूर्वी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. याबाबत वैद्यकीय अधिकारी डॉ. प्राची सुरतवाला यांच्या खबरीवरून रामानंदनगर पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास रामानंदनगर पोलिस कर्मचारी करीत आहे.

Protected Content