धावत्या रेल्वेत प्रसवकळा; स्टेशनवरच प्रसुती मात्र बाळ दगावले

rajshthna

जळगाव प्रतिनिधी । नवजीवन एक्सप्रेसने चेन्नईहून राजस्थानला जाणाऱ्या एका आठ महिन्याची गर्भवती महिलेची जळगावच्या रेल्वे स्थानकात अचानक प्रसूती झाली. आई व बाळाला जिल्हा रुग्णालयात दाखल केल्यावर वैद्‌यकिय अधिकारी यांनी नवजात मुलीला मृत घोषित केले. आईवर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

रेल्वे पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शारदादेवी हंसराज प्रजापती (वय-30) रा.सेलोरा (राजस्थान) ह्या आपले पती हंसराज प्रजापती, तीन वर्षाची मुलगी खुशबु आणि दीड वर्षाची मुलगा यांच्यासह काका रामलाल प्रजापती यांच्यासोबत प्रसुतीसाठी चेन्नईहून राजस्थानकडे नवजीवन एक्सप्रेसने जात होते. आज सकाळी 9.30 वाजता नवजीवन एक्सप्रेस भुसावळ रेल्वेस्थानकाजवळ आल्यानंतर शारदादेवी यांना प्रसुती कळा जानवायला लागले. पती हंसराज प्रजापती यांनी लागलीच रेल्वे टीसीशी बोलून याबाबत माहिती सांगितले. रेल्वे टिसी यांनी पुढचे स्टेशन अर्थात जळगाव रेल्वे स्थानकाला घटनेबाबत कळविले. त्यानुसार नवजीवन एक्सप्रेस जळगाव रेल्वे स्थानकावर येण्यापुर्वी रेल्वे प्रशासन आणि रेल्वे पोलीसांनी तयारी करून ठेवली. सकाळी 9.40 वाजता रेल्वे जळगाव रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफार्म क्रमांक 2 दोनवर येतात रेल्वे पोलीसांनी तातडीन महिलेला रेल्वेतून खाली उतरविले. महिलेचा प्रसुती होताच रेल्वेच्या महिला सफाई कर्मचारी यांनी आपल्याजवळ असलेल्या कापडाने नवजात मुलीला गुंडाळले. व तातडीने जिल्हा सामान्य रूग्णालयात रिक्षाने रवाना झाल्या. मात्र वैद्यकिय अधिकारी डॉ. मोहित पाटील यांनी नवजात बाळाला मृत घोषीत केले. तर महिलेला जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचारार्थ दाखल केले.

शारदादेवी यांची प्रकृती स्थिर आहे, हंसराज प्रजापती हे चेन्नई येथे मोबाईल असेसरीजचे दुकान आहे. पत्नी शारदादेवी गर्भवती असल्याने तिला प्रसुतीसाठी राजस्थान येथे घेवून जात होते. यावेळी रेल्वे पोलीस कर्मचारी रविंद्र ठाकूर, शैलेंद्र पाटील, पो.ना. योगेश चौधरी, पो.ना. मनोज मेश्राम, योगेश अडकणे यांनी मदत केली.

Protected Content