पिंप्राळा हुडको येथून ४५ वर्षीय महिला बेपत्ता

जळगाव प्रतिनिधी । शहरातील पिंप्राळा हुडको येथून ४५ वर्षीय विवाहिता घरात आई व मुलाला काहीही न सांगता घरातून बेपत्ता झाली आहे. रामानंद नगर पोलीस ठाण्यात हरविल्याची नोंद करण्यात आली आहे.

पोलीस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी, रत्नाबाई सुकदेव अडकमोल (वय-४५) रा. सिध्दार्थ नगर, पिंप्राळा हुडको येथे आई ठगूबाई सुकदेव अडकमोल आणि मुलगा भोला हनुमान चौधरी यांच्यासोबत राहते. २४ मे २०१८ रोजी सकाळी ५ वाजता घरात सर्वजण झोपले असता. रत्नाबाई अडकमोल ह्या घरातून बेपत्ता झाल्या आहेत. आईन ठगूबाई आणि मुलगा भोला यांनी त्यांच्या नातेवाईकांकडे फोन लावून रत्नाबाई बाबत विचारपूस केली. त्या अद्यापपर्यंत घरी आलेल्या नाहीत. रत्नाबाई ह्या गृहिणी असून रंगाने निमगोरा, बांधा मजबूत, उंची पाच फुट, चेहरा लांबट, केस मध्यम व काळे व उजव्या हाताच्या कमरेवर तूळशीचे चित्र गोंधलेले असे विवाहितेचे वर्णन असून कुणी ओळखत असल्यास शहरातील रामानंदनगर पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा असे आवाहन केले आहे. पुढील तपास पोहेकॉ राजेश भावसार करीत आहे.

Protected Content