भुसावळात तलवार घेवून दहशत माजविणाऱ्यास अटक

Bhusawal crime news

भुसावळ प्रतिनिधी । शहरातील बसस्थानक परीसरात हातात तलवार घेवून नागरीकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्यास भुसावळ बाजारपेठ पोलीसांनी अटक करून त्याच्या ताब्यातील तलवार हस्तगत केली. याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

store advt

पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संशयित आरोपी अजय ऊर्फ सोनु मोहन अवसरमल (वय-22), रा.राममंदिर चिंचाल, लालबाग, बऱ्हाणपूर, मध्यप्रदेश ह.मु.भारत नगर भुसावळ हा भुसावळ बसस्थानक परीसरातील सार्वजनिक जागेत दुपारी 3 वाजता हातात धारदार तलवार घेवून नागरीकांमध्ये दहशत निर्माण करत असल्याची गुप्त माहिती पोलीस अधिक्षक डॉ. पंजाबराव उगले यांना मिळाल्यानंतर अप्पर पो.अधिक्षक भाग्यश्री नवटके, उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन राठोड आणि पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली भुसावळ बाजारपेठ पोलीस कर्मचारी पो.ना.रविंद्र बिऱ्‍हाडे, पो.कॉ उमाकांत पाटील, कृष्णा देशमुख, विकास सातदिवे, ईश्वर भालेराव, प्रशांत परदेशी यांनी कारवाई करत संशयित आरोपी अजय मोहन अवसरमल याला अटक केली व त्याच्या ताब्यातील धारदार तलवार हस्तगत केली आहे. त्याच्या विरोधात भुसावळ बाजार पोलीसात भाग 6 गु.र.न 559 /2019 आर्म अँक्ट 4/25आर्म ॲक्ट कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संशयित आरोपी अजय ऊर्फ सोनु मोहन अवसरमल याच्या विरोधात यापुर्वी भुसावळ बाजार पेठे, भुसावळ शहर पोलीस स्टेशन, मुक्ताईनगर पोलीस स्टेशन, भुसावळ रेल्वे जी.आ. पोलीस स्टेशन येथे जबरी चोरी, खून करण्याचा प्रयत्न आणि आर्म ॲक्टप्रमाणे विविध गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

error: Content is protected !!