Home धर्म-समाज दहीहंडीला मिळणार खेळाचा दर्जा : शिंदे सरकारचा ऐतिहासिक निर्णय

दहीहंडीला मिळणार खेळाचा दर्जा : शिंदे सरकारचा ऐतिहासिक निर्णय

0
39


मुंबई लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | खास मराठमोळ्या समजल्या जाणार्‍या दहीहंडीला राज्य सरकारने खेळाचा दर्जा देण्याची तयारी केली असून याबाबत उद्या अधिकृत घोषणा होणार आहे.

दहीहंडीला खेळाचा दर्जा देण्यात यावा. अशी कधीपासूनच मागणी करण्यात येत होती. एकनाथ शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी याबाबतचे सूतोवाच केले होते. आता हा उत्सव दोन दिवसांवर आला असतांना राज्य सरकारने याला खेळाचा दर्जा देण्याची तयारी सुरू केली आहे. याबाबत उद्या विधानसभेत अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे.

राज्य शासनाच्या निर्णयामुळे मराठमोळ्या दहीहंडीला खेळाचा दर्जा मिळणार आहे. यासोबत प्रो-कबड्डी प्रमाणेच लवकरच प्रो-दहीहंडी या भव्य स्पर्धेचे आयोजन करण्याचा निर्णय देखील राज्य सरकारने घेतला असून याबाबत उद्याच घोषणा होण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे सरकारचा हा निर्णय खूप महत्वाचा मानला जात असून याचे राज्यभरात स्वागत होण्याचे संकेत आहेत.


Protected Content

Play sound