दहीगाव येथे आषाढी एकादशीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

dahigaon

यावल प्रतिनिधी । तालुक्यातील दहीगाव येथील प्रती पंढरपूर ख्याती असलेले सार्वजनिक विठ्ठल रुक्माई मंदिरात आषाढी एकादशीनिमित्त सकाळी 5 वाजेपासून श्री विठ्ठल रुक्माईची पुजाआर्चाचा कार्यक्रम 12 नवविवाहित जोडपे त्यांच्याहस्ते करण्यात येणार आहे.

विधीचे काम प्रवीण कुलकर्णी व हरी गोसावी हे करणार आहेत. यानिमित्त 10 क्विंटल साबुदाणा, 2 क्विंटल केळी, चहा, कॉफी भाविकांना वाटप करण्यात येणार आहे. सार्वजनिक विठ्ठल रुक्माई ट्रस्ट मार्फत आरोग्य व सर्वरोग निदान शिबिराचे आयोजनही करण्यात आलेले आहे शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे 150 वर्षाची परंपरा असलेले येथील सार्वजनिक विठ्ठल रुक्माई मंदिर सन 1998 मध्ये तत्कालीन सरपंच तथा सार्वजनिक विठ्ठल रुक्माई ट्रस्टचे अध्यक्ष सुरेश पाटील व कै.रावजी पाटील, प्रकाश सोनार, आत्माराम महाजन श्रीपत महाजन यांचेसह अनेकांनी गुजरात, महाराष्ट्र, मध्य प्रदेशात जाऊन लोकवर्गणी जमा केली. त्या माध्यमातून या भव्य मंदिराचे बांधकाम करण्यात आले. सण 1998 पासून दरवर्षी येथे आषाढी एकादशीपासून मोठा यात्रोत्सव पार पडत आहे. यात्रोत्सवानिमित्त जळगाव, कानडदा, शिरसाळ, साकळी, चुंचाळे व परिसरातील हरिभक्त परायण दिंडी सोहळा येत असतात व मोठ्या उत्साहाने येथे भावगीते म्हणून दिवसभर करमणूक करीत असतात. विठ्ठल रुक्माईच्या नामगजरात सारा गाव दिवसभर दुमदुमून निघत असतो. सायंकाळी 5 वाजता मंदिरापासून भव्य दिंडी सोहळा गावातून काढण्यात येतो. दिवसभर हजारो भाविक येथे येऊन माऊलीचे दर्शन घेत असतात व व महाप्रसादाचा लाभ घेत असतात यात्रोत्सवानिमित्त माऊलीची पूजा संगीता सरोदे, काजल माळी, रोहिणी पाटील, देविका गायकवाड, पूजा पाटील, ऐश्वर्या लोहार, काजल पाटील, हर्षाली चौधरी, ताराचंद पाटील, हर्षाली चौधरी, धनश्री पाटील, अंकिता पाटील, देविका पाटील, सुनंदा पाटील यांचे मार्फत होणार आहे. विठ्ठल मंदिर ट्रस्ट मार्फत सुरेश पाटील यांचे मार्गदर्शनाखाली रक्तदान शिबिर माधवराव गोळवलकर सहाय्य सेवा रक्तपेढी जळगाव या संघटनेमार्फत आयोजित करण्यात आले आहे. रक्तदानासाठी व नाव नोंदणीसाठी मयूर पाटील, कोमल पाटील, प्रवीण बडगुजर, प्रकाश कोळी, अरुण पाटील यांचेशी संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

आरोग्य सर्व रोग निदान आरोग्य शिबिरासाठी चोपडा येथील डॉ.चंद्रकांत बारेला सेच गावातील डॉक्‍टर्स उपस्थित राहणार आहेत. किनगाव येथील सातपुडा एक्वा तर्फे शुद्ध पाणीपुरवठा भाविकांना देण्यात येणार आहे. नथू कोळी यांचे मार्फत 2न क्विंटल केळी आणि तरुण मित्र मंडळातर्फे चहा व कॉफी देण्यात येणार आहे असे आयोजकांनी सांगितले यासाठी गावातील हरिभक्त परायण मंडळी तसेच स्वयंपाकी तरुण वर्ग परिश्रम घेत असतात माऊलीच्या दर्शनाचा जिल्ह्यातील भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन सृष्टीचे अध्यक्ष सुरेश पाटील यांनी केले आहे.

Protected Content