‘ते’ पैसे कोविडसाठी वापरा

 

मुंबई, वृत्तसेवा ।इंदू मिलवरील जागेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या राष्ट्रीय स्मारकाच्या पुतळ्याच्या कार्यक्रम मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार होता. मात्र हा, कार्यक्रम रद्द करण्यात आला असून मुख्यमंत्री ठाकरे यांनी सर्वांच्या सहभागानं पायाभरणी होणार असल्याचं सांगितलं आहे.  दरम्यान, इंदू मिल येथे पुतळ्यासाठी वापरण्यात येणारे पैसे कोविडसाठी खर्च करावेत अशी भूमिका वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी घेतली आहे.

मुख्यमंत्र्यांनी कार्यक्रम रद्द केला असला तरी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी आपला या पुतळ्याला विरोध असून ते पैसे कोविडसाठी खर्च करावे, असं म्हटलं आहे. “मी यापूर्वीपासून सांगतोय की पुतळ्याला माझा विरोध आहे. पुतळ्यासाठी वापरला जाणारा पैशातून जिल्ह्या जिल्ह्यांमध्ये कोविड सेंटर उभं करावं. आज त्याची अधिक गरज आहे. हा पैसा त्यासाठी वापरला तर अजून अनेकांचे जीव वाचवण्यास आपल्याला मदत होईल. कोरोनातून लोकांना वाचवणं ही सर्वात मोठी गरज आहे. त्यामुळे पुतळ्यावर खर्च करण्याऐवजी तो निधी कोरोनासाठी खर्च करावा,” असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.

Protected Content