काँग्रेस भवनजवळ दत्त जयंतीला भजन संध्या : भाविक मंत्रमुग्ध

जळगाव, प्रतिनिधी | शहरातील काँग्रेस भवन बाहेर असलेल्या श्री गुरुदत्त मंदिरात श्री दत्त जन्मोत्सवनिमित्त भजन गायक नारायण ओझा यांच्या ग्रुपतर्फे भजनसंध्या कार्यक्रम सादर करण्यात आला. भजन ऐकण्यासाठी थंडीतही भाविकांचा उत्साह पहावयास मिळाला.

 

श्री गुरुदत्त जन्मोत्सवनिमित्त काँग्रेस भवन जवळील दत्त मंदिरात दिवसभर भाविकांची गर्दी होती. जन्मोत्सवानिमित्त मंदिराची आकर्षक सजावट करण्यात आली होती. सकाळी १० वाजेपासून भाविकांनी दर्शनासाठी आणि सत्यनारायणाचा प्रसाद घेण्यासाठी गर्दी केली होती. सायंकाळी ७ वाजेपासून सुप्रसिद्ध गीतकार नारायण ओझा व सहकाऱ्यांनी दल भजन सादर केले. भजनाची सुरुवात गणेश वंदनाने केल्यानंतर गीतकार नारायण ओझा यांनी श्री गुरुदत्त, सप्तशृंगी माता, विठ्ठलाची भजने सादर करून देशभक्तीपर गीतांनी सांगता केली. कडाक्याच्या वातावरणात देखील भाविकांनी भजन ऐकण्यासाठी गर्दी केली होती. अवघ्या तीन तासात संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता. भाविक देखील भजनाने मंत्रमुग्ध झाले. भजन संध्यासाठी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार, शहराध्यक्ष शाम तायडे, श्याम राणा, विशाल शिर्के, स्वप्नील तळवंदे, भरत शार्दूल, श्याम सोनवणे, रवी पाटील, योगेश बारी, जगदीश नन्नवरे आदींनी सहकार्य केले.

Protected Content