Home आरोग्य देशात ५२ लाख कोरोनाबाधित : ४२ लाख कोरोनामुक्त

देशात ५२ लाख कोरोनाबाधित : ४२ लाख कोरोनामुक्त

0
28

नवी दिल्ली, वृत्तसेवा । आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार देशातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ५३ लाखांच्या पुढे गेली आहे., गेल्या २४ तासांत देशात ९३ हजार ३३७ नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर एक हजार २४७ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

देशातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ५३ लाख ८ हजार १५ इतकी झाली आहे. यापैकी १० लाख १३ हजार ९६४ जणांवर उपचार सुरु आहेत. तर ८५ हजार ६१९ जणांचा मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे ४२ लाख रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आयसीएमआरने दिलेल्या माहितीनुसार, देशात आतापर्यंत सहा कोटी २४ लाख ५४ हजार २५४ करोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. यापैकी गुरुवारी ८ लाख ८१ हजार ९११ करोना चाचण्या करण्यात आल्या आहेत.


Protected Content

Play sound