भोगवटा प्रमाणपत्रासाठी कागदपत्रे देवून देखील टाळाटाळ–लोकशाही दिनी तक्रार (व्हिडिओ)

जळगाव, प्रतिनिधी ।  जून २०१८ पासून भोगवटा प्रमाणपत्र मिळावे अशी मागणी  प्रतापसिंग परदेशी यांनी वारंवार करून देखील त्यांना भोगवटा प्रमाणपत्र मिळत नसल्याने त्यांनी आज लोकशाही दिनी आयुक्तांकडे आपले गाऱ्हाणे मांडले. मात्र,नगररचना विभागातील कर्मचारी ते देण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप त्यांनी ‘लाईव्ह ट्रेंड्स न्यूज’शी बोलतांना केला.  

प्रतापसिंग परदेशी यांनी पुढे सांगितले की,  भोगवटा प्रमाणपत्रासाठी आवश्यक असणरी सर्व  कागदपत्रे देऊन देखील कर्मचारी पुन्हा त्यांची मागणी करत आहेत याचा अर्थ ती कागदपत्रे गहाळ झाली असून कागदपत्रे गहाळ करणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली. तसेच एका दुसऱ्या तक्रारीत  २०१५ पासून लोकशाही दिनी वारंवार तक्रार करून देखील मनपा प्रशासन अतिक्रमित घर पाडत नसून त्यांच्या तक्रारीची कोणतीही दखल घेत नसल्याचा आरोप मास्टर कॉलनीतील रहिवासी अलीम सलाउद्दीन खाटिक  यांनी केला. प्रत्येक महिन्याच्या लोकशाही दिनी येऊन तक्रार करीत आहे. मात्र, कोणीही त्याची दखल घेत नाही. न्यायालयाचे आदेशांचे पालन देखील करण्यात येत नाही. नगररचना विभागातील अधिकारी हे मागील ५ वर्षापासून  सुलतान सुलेमान खाटिक, सुलेमान मोहम्मद खाटिक यांचा  बचाव करीत आहेत. सुलतान सुलेमान खाटिक, सुलेमान मोहम्मद खाटिक हे गुंड प्रवृत्तीचे लोक असून त्यांना मनपा घाबरते असा आरोप त्यांनी केला. आज तीन दिवसात कारवाई करण्याचे आश्वसन देण्यात आले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

आज एकूण ७ तक्रारी प्राप्त झाल्यात. यात नगररचना विभाग ३, आरोग्य व बांधकाम विभाग मिळून १, नगररचना व अतिक्रमण विभाग मिळून २ , नगररचना व प्रभाग समिती क्र. १ विभाग मिळून १ असे एकूण ७ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.

लोकशाही दिन आयुक्त सतीश कुलकर्णी यांच्यासह उपायुक्त प्रशांत पाटील, शहर अभियंता अरविंद भोसले, पाणीपुरवठा उपभियांता  सुशील साळुंखे, प्रभाग समिती क्र. १ अधिकारी व्ही. ओ. सोनवणी, प्रभाग समिती क्र. २ अधिकारी राजेंद्र पाटील, प्रभाग समिती क्र. ३ अधिकारी बाळासाहेब चव्हाण, प्रभाग समिती क्र. ४ अधिकारी उदय पाटील, विद्युत विभागाचे उपभियांता एस. एस. पाटील, नगरसचिव सुनील गोराणे व जनसंपर्क अधिकारी महेद्र पाटील आदी उपस्थित होते.        

https://www.facebook.com/508992935887325/videos/336036877961499

 

Protected Content