दगडी मनवेलकर मोहन सोनवणे पायी जाणार श्रीराम जन्मभूमी

यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी |  तालुक्यातील मनवेल येथील रहिवाशी असलेला मोहन मंगल सोनवणे (वय ४५) हे दगडी ते श्रीराम जन्मभूमी अयोध्या येथे दि.३१ डिसेंबर रोजी सकाळी पदयात्रा करत रवाना होत आहे.

२२ जानेवारी रोजी अयोध्या येथे श्रीराम मंदिराच्या जिणोध्दार, प्रभू श्रीराम टेंट मधुन जन्मस्थानच्या गर्भगृहात विराजमान होणार आहेत. या अशा पावन पवित्र पर्वाचे साक्षीदार होऊन, प्रभू श्रीरामचे दर्शन करण्यासाठी ३१ डिसेंबर रोजी सकाळी चार वाजता दगडी या गावातून मोहन सोनवणे यावल – रावेर – बुरहाणपुर – अंबाडा – खंडवा मार्ग १ हजार २६७ किलोमीटरचा प्रवास करीत, २१ जानेवारी पर्यत पायी पदयात्रा करून अयोध्या पहोचणार आहेत.

३१ डिसेंबर रोजी सकाळी चार वाजता मनवेल येथील श्री मानकेश्वर महादेव  मंदिरात महादेवाचे दर्शन , महर्षि वाल्मिक फलक पुजन व धुनीवाले दादाजी दरबार येथून दर्शन  घेऊन आपली पदयात्रेस रवाना होणार असुन, ज्या गावी रात्र होईल त्या ठिकाणी मंदिरात मुक्काम करुन २१ जानेवारी पर्यत कुठल्याही परीस्थितीत अयोध्या येथे जाण्यासाठी निर्धार करीत मार्गस्थ होत आहे.

मोहन सोनवणे हे अत्यंत गरीब  परिस्थिती राहुन आठ व्यक्तीचा कुंटुंब असून केळी पासून वेफर बनविणे व गावोगावी जावून विक्री करणे व सहा मुली, पत्नी व स्वत आठ व्यक्ती चा कुंटुंबाचा उदरनिर्वाह करणारी व्यक्ती असून प्रभु श्रीरामावर असलेली त्यांची अपार श्रध्दा मनाशी बाळगून मोहन मंगल सोनवणे अयोध्या येथे जात असल्यामुळे सर्वत्र कौतूक होत आहे. जय श्री राम आपली यात्रा सफल सुखद मंगलमय हो अशी प्रार्थना समस्त दगडी मनवेल ग्रामस्थ बांधव करीत आहेत.

Protected Content