बहिणाबाई कोविड केअर सेंटरमध्ये रुग्णांसाठी मनोरंजनाची साधने..!

 

जळगाव, प्रतिनिधी । कोरोना संकटात अनेक जण मदतीसाठी पुढे सरसावले आहेत. जळगावातील काही युवकांची टीम कोविड 19 च्या रुग्णांना निस्वार्थपणे आणि विनामूल्य सेवा देत , या सामाजिक कार्याला बळ देत त्यांनी एक वेगळा ठसा उमटवला आहे.

लेवा पाटीदार सोशल फाऊंडेशन आणि लोकसंघर्ष मोर्चा यांच्या संयुक्त विद्यमाने शासकीय तंत्र निकेतनच्या मुलींचे वसतीगृह येथे सुरू झालेल्या बहिणाबाई कोविड केअर सेंटरमध्ये रुग्णांसाठी मनोरंजनासाठी एफ. एम.रेडिओ , महेश चौधरी यांच्यावतीने रंगीत टी. व्ही.संच तसेच विविध दैनिके , नियतकालिके यांची उत्तम व्यवस्था करण्यात आली आहे. याबद्दल बहुतांश रुग्णांनी येथे अगदी घरासारखेच वातावरणाचा अनुभव येत असल्याचे बोलून दाखविले. सेंटरच्या परिसरात स्वच्छता व चांगल्या पद्धतीने रुग्णांची काळजी ,व दर्जेदार भोजन , नाश्ता मिळत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले आहे. सेंटरचे सर्व पदाधिकारी हे निस्वार्थ भावनेने झटणारे व्यक्तिमत्त्व आहेत असे गौरवोद्गार रुग्ण काढीत आहेत. गेल्या आठवड्यापासून जरी रुग्ण कमी होत असले तरी कोरोना हा काही गेलेला नाही , खबरदारी घेणेच महत्त्वाचे आहे.संक्रमित रुग्णांवर तात्काळ उपचार करणे गरजेचे आहे. त्यानुसार हे सेंटर कार्यरत आहे. सेंटरमध्ये आजमितीस येथे ५५ रुग्ण उपचार घेत आहेत. या सेंटरचे पदाधिकारी प्रतिभाताई शिंदे , चंदन कोल्हे , सचिन धांडे , चंदन अत्तरदे , तुषार वाघुळदे , अभिजित महाजन, भरत कर्डिले , राजेश पाटील, हितेश पाटील, संदीप पाटील , ऍड. पुष्कर नेहते , भूषण बढे ,किरण वाघ ,प्रमोद पाटील ,पराग महाजन ही तरुण टीम समर्थपणे सांभाळत आहेत.

Protected Content