शिक्षणमहर्षी डॉ.पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषदेच्या जिल्हाध्यक्षपदी गणेश देशमुख

पाचोरा प्रतिनिधी । जिजाऊ सृष्टी सिंदखेडराजा जि. बुलढाणा येथे झालेल्या राज्यस्तरीय सभेत शिक्षण महर्षी डॉ. पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषद या शिक्षक संघटनेच्या जळगाव जिल्हाध्यक्षपदी जि. प. प्राथमिक शाळा (अंचळगाव), ता. भडगाव येथील शिक्षक गणेश देशमुख यांची तर प्रदीप पाटील, जि. प. शाळा गोराडखेडा ता. पाचोरा यांची जिल्हा प्रतिनिधी म्हणून निवड करण्यात आली.

शिक्षक परिषदेचे प्रदेशाध्यक्ष  प्रभाकर झोड, प्रदेश महासचिव व्यंकटराव जाधव, राज्य कार्याध्यक्ष धनंजय उजनकर तसेच मराठा सेवा संघाचे मधुकर मेहकरे, अर्जूनराव तनपुरे यांच्या प्रमुख उपस्थितीत नियुक्तीपत्र देण्यात आले.

संघटनेच्या माध्यमातून शिक्षकांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करण्यास प्राधान्यक्रम देण्यात येईल असे जिल्हाध्यक्ष गणेश देशमुख यांनी आपल्या मनोगतात सांगितले. संघटनेची ध्येयधोरणे शिक्षकांपर्यंत पोहचविण्यासाठी व संघटना वाढीसाठी लवकरच जिल्ह्यातील  प्रत्येक तालुक्यात शिक्षक परिषदेची कार्यकारिणी जाहिर करून विविध उपक्रम राबविण्याचा मनोदय प्रदीप पाटील यांनी व्यक्त केला. जिल्हा कार्यकारणीच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे प्राथमिक शिक्षणाधिकारी विकास पाटील आणि भडगावचे गटशिक्षणाधिकारी परदेशी साहेब, नाशिक विभागीय अध्यक्ष प्रेमचंद अहिरराव, मुख्याध्यापक गुणवंत पवार, दिपक धनगर व अनेक शिक्षकांनी अभिनंदन केले आहे.

Protected Content